तालुका पोलिसांच्या कारवाईत अवैध घुटका जप्त वाहनासह 28 लाखांच्या मुद्देमाल हस्तगत




तालुका पोलिसांच्या कारवाईत अवैध घुटका जप्त 

वाहनासह 28 लाखांच्या मुद्देमाल हस्तगत

शिरपूर  -शिरपुर तालुका पोलीस ठाणे येथील पथकाने महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची अवैधरित्या होणाऱ्या वाहतुकीला रोखुन लाखोंचा माल केला जप्त केला आहे. दि.04/05/2024 रोजी 18.00 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनिय बातमी मिळालो की, सेंधवा कडुन शिरपुर कडे एक कंटेनर क्र. KA 01 AN 1957 हिच्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला पानमसाला युक्त गुटख्याची अवैध वाहतुक होत आहे. अशी बातमी मिळाल्यावरुन लोकसभा निवडणुक- 2024 च्या अनुषंगाने मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळील असलेला चेकनाका वरोल असई/कैलास जाधव, असई / राजेंद्र काटकर अशांना सदरचे वाहन थांबवून खात्री करणे बाबत आदेशित केले होते. पोलीस अंमलदारांना वरील क्रमांकाचे वाहन हे सेंधवाकडुन येतांना दिसल्याने वाहनावरील चालकास वाहन थांबविण्याचा ईशारा केला असता, त्या वाहनावरील बालकाने त्याचे ताब्यातील वाहन न थांबवता पुढे शिरपुर कडे पळवून घेवून गेला. त्यामुळे पोलीस ठाण्यात हजर असलेले शोधपथकाचे पोलीस अंमलदार पोहेकॉ/संतोष पाटील, पोकों/ योगेश मोरे, पोकों/ स्वप्निल बांगर, पोकों/ भुषण पाटील, पोकों/संजय भोई अशांना सदर वाहनाचा शोध घेवून बातमीची खात्री करुन कारवाई करणेबाबत आदेशित केल्यावरुन वरील पथकाने सदर वाहनाचा शोध घेवून हाडाखेड तपासणी नाका येथून पाठलाग करुन सोनगीर गावाजवळ पकडली. वाहनावरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शौकीन चांद, वय-35 वर्षे, व्यवसाय चालक, रा. घर नं. 11 मशिदजवळ मचरोली ता. नूह जि. मेवात (हरियाणा) असे सांगून वाहनात काय माल आहे बाबत विचारले असता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिले. तसेच त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याने त्यास ताब्यात घेवून विश्वासात घेवून विचारपुस केली असता, त्याने सांगितले की, सदर वाहनात पानमसाला युक्त गुटखा व इतर ट्रान्सपोर्टचा माल भरलेला आहे. त्यामुळे सदर बातमीची खात्री झाल्याने वाहनाची तपासणी करणेकरीता शिरपुर तालुका पोलीस ठाणे येथे योग्य जाप्त्यानिशी सदरचे वाहन लावण्यात आले होते.

दि.05/05/2024 रोजी अन्न व औषध प्रशासन विभाग धुळे यांचे कडील अन्न सुरक्षा अधिकारी श्री किशोर हिमतराव बाविस्कर यांचे मार्फतीने दोन पंचांसमक्ष कंटेनर क्र. KA 01 AN 1957 हिच्यालील मालाची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला पानमसाला युक्त गुटखा मिळुन आला तो.

1) 6,31,176/- काका नावाचा पानमसाला व VC-20 नावाची तंबाखु (मोठे पाऊच)

2) 1,97,400/- काका नावाचा पानमसाला व VC-5 नावाची तंबाखु (लहान पाऊच)

3) 16,800/- KC-1000 नावाची जाफरानी जर्दा 
4)3,84,000/- प्रिमियम एक्स एल-1 नावाची जाफरानी जर्दा

5) 57,120/- HOT प्रिमियम नावाचा पानमसाला

6) 28,560/- HOT प्रिमियम नावाची तंबाखु

7) 15,00,000/- टाटा कंपनीचे कंटेनर क्र. KA 01 AN 1957 असलेले वाहन.

एकुण:- 28,15,056/- (13,15,056 रु. किं.चा पानमसाला व तंबाखु + 15,00,000/- रु. किं. चे वाहन) सदर मुद्देमाल हा प्रतिबंधीत असल्याची खात्री झाल्याने वरील मुद्देमाल, वाहन जप्त करुन त्यावरील चालकाविरुध्द पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक श्रीराम पवार, पोसई/कृष्णा पाटील, पोहेकॉ/ संतोष पाटील, पोशि/ योगेश मोरे, पोशि/ भूषण पाटील, पोशि/स्वप्निल बांगर, पोशि/ संजय भोई, यांनी केलेली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने