बामखेडा त.त.येथे अडीच लाखाचा विमल गुटखा जप्त; अवैध गुटखा वाहतुकीमुळे शहादा शहर व तालुक्यात चोरटी गुटखा विक्री सुरूच





बामखेडा त.त.येथे अडीच लाखाचा विमल गुटखा जप्त;
अवैध गुटखा वाहतुकीमुळे शहादा शहर व तालुक्यात चोरटी गुटखा विक्री सुरूच

शहादा --

नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या घटका विक्रीवर कडक कारवाईचे आदेश असताना अवैध गुटखा वाहतुकीच्या प्रमाणात वाढ झाली असून मोठ्या प्रमाणावर पॉलिसी कारवाईत मुद्देमाल देखील मिळून येत आहे. आणि त्यामुळे जिल्ह्यात शहादा तालुक्यात चोरट्या गुटखा विक्री सुरू असल्याची कुजबुज नागरिकांमध्ये आहे.
   तालुक्यातील बामखेडा त. त. येथे ग्रामपंचायतीच्या शॉपिंग सेंटर मधील एका दुकानावर स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी कारवाई करीत २ लाख 50 हजार रुपये किमतीचा विमल गुटखा जप्त केला असून सारंगखेडा पोलिसात याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला असून पेमाराम लुम्बारामजी चौधरी या संशयीतास अटक करण्यात आली आहे ही कारवाई दि . १ मे रोजी करण्यात आली
     महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला तंबाखू मिश्रित विमल गुटखा शहादा शहरासह तालुक्यात सर्रासपणे विकला जात असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी या विरोधात कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने सारंगखेडा पोलीस हद्दीतील बामखेडा त. त .येथे विमल गुटखा विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळाली त्यांना ग्रामपंचायतीच्या शॉपिंग सेंटर मध्ये एका दुकानात पेमाराम चौधरी अवैधरित्या विमल गुटखा विक्री करीत असल्याचे आढळून आल्याने त्याच्या जवळील सुमारे दोन लाख 50 हजार रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू मिश्रित विमल गुटखा जप्त केला गुन्हा शाखेचे पोलीस शिपाई यशोदीप ओगले यांच्या फिर्यादी वरून सारंगखेडा पोलीस ठाण्यात पेमाराम लुंबारामजी चौधरी बामखेडा त. त .याच्या विरोधात कलम 328, 188, 272, 273 तसेच अन्नसुरक्षा मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्यास अटक करण्यात आली आहे ही कारवाई दि.१ मे रोजी करण्यात आली तपास सपोनी योगेश चौधरी करीत आहेत.
   दरम्यान , मिळालेल्या माहितीनुसार सदर कारवाई दिनांक १ मे रोजी सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान करण्यात आल्यानंतर गुन्हा शाखेच्या पोलिसांकडून सारंगखेडा पोलिसात २ मे रोजी रात्री सव्वा बारा वाजता कारवाई केल्याची माहिती देण्यात येऊन तशी नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे जर कारवाई सायंकाळी  करण्यात आली तर गुन्हा शाखेच्या त्या पोलिसांनी इतक्या उशिरा  मध्यरात्री कारवाई केल्याची माहिती सारंगखेडा पोलीस ठाण्यात  देण्याचे गौडबंगाल काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या कारवाई प्रकरणी उलट सुलट चर्चांना वेग आला आहे.

  शहादा तालुक्यात चोरटी गुटखा विक्री 

शहादा शहरासह तालुक्यात तंबाखू मिश्रित विमल गुटख्याची अवैधरित्या विक्री व वाहतूक सुरूच असून विमल शोकिनांना अव्वाच्या सव्वा भावात विमल गुटखा विक्री केला जात असून शहरात खुलेआम विमल गुटखा विक्री होत असल्याचे चित्र दिसत आहे  विमल तस्कर मात्र यातून बक्कळ पैसा कमवित असल्याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडन आता कडक कारवाई करून गुटखा विक्री बंद करण्याची मागणी होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने