मविआचे उमेदवार गोवाल पाडवी यांना अभूतपूर्व प्रतिसाद; ढोलच्या तालावर खांद्यावर नाचवले.
प्रतिनिधी, शिरपूर
नंदुरबार लोकसभा मतदार संघाची अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाविकास आघाडीचे (कांग्रेस) उमेदवार एड. गोवाल पाडवी यांचा काल तालुक्याच्या ग्रामीण आदिवासी भागात झंझावाती दौरा झाला. विविध गावात ढोल - मांदल वाजवून, आरती करून तर कुठे खांद्यावर घेवून नाचवत गोवाल पाडवींना आमचे गाव पंजासोबत असल्याची ग्वाही दिली. दरम्यान आपल्या अभ्यासू भाषणाने आणि संयमी स्वभावाने गोवाल पाडवींनी उपस्थितांची मने जिंकली.
काल तालुक्याच्या आदिवासी भागातील सुळे गावापासून गावभेट दौरा सुरू झाला. प्रत्येक गावात लोकांचा उत्साह प्रचंड दिसत होता. कडक ऊन्हातही आदिवासी बांधव उमेदवाराची वाट पाहत होते. भेटी प्रसंगी गोवाल पाडवी यांनी आदिवासी भागातील वनपट्टयांची समस्या, पेसा भरती, महागाई, भ्रष्टाचार, शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज यांसारख्या मुलभूत समस्यांना हात घातला. आणि त्या सोडवण्यासाठी संसदेत वकीली करण्याचा वादा केला. यावेळी महिला आणि युवकांचा प्रतिसाद प्रचंड होता. उमेदवरांनी नागरिकांच्या समस्याही ऐकून घेतल्या. हिगांव येथे फटाक्यांच्या आतिशबाजी झाली तर वडेल खू. आणि आंबे, भीलटपाडा जामण्यापाडा येथे ढोल, मांदल वाजवून मीरवणूक झाली. रात्र असतांना देखील लोकांचा प्रचंड उत्साह दिसत होता. खंबाळे गावात तर रात्री खूप उशिरापर्यंत उमेदवाराची वाट पाहत महिला व नागरिक थांबून होते.
एड. पाडवी यांनी कोणावरही टीका न करता लोकांसाठी काम करणार असल्याचे सांगतात. परिणामी उमेदवार अत्यंत शालीन, नम्र आणि अभ्यासू असलाची चर्चा लोक करतात. सुळे, कनगई, चिलारे, लाकड्या हनुमान, रोहीणी, भोईटी, खामखेडा (प्र. आंबे) हिगांव, हिवरखेडा, वडेल खू, आंबे, भीलटपाडा, जामण्यापाडा, खंबाळे असे मिळून जवळपास 25 गावात दौरा झाला. यावळी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. आदिवासी महिला, युवक भाजपा बद्दल असलेला तीव्र संताप उघडपणे व्यक्त करतात.


