नंदुरबार लोकसभा ब्रेकिंग महाविकास आघाडीचे उमेदवार एडवोकेट गोवाल पाडवी यांना बिरसा आर्मी आणि आरपीआय आठवले गटाच्या जाहीर पाठिंबा



नंदुरबार लोकसभा ब्रेकिंग 
महाविकास आघाडीचे उमेदवार एडवोकेट गोवाल पाडवी यांना बिरसा आर्मी आणि आरपीआय आठवले गटाच्या जाहीर पाठिंबा 

नंदुरबार प्रतिनिधी - नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीची आणि इतर अपक्ष उमेदवार यांच्यात लोकसभा निवडणुकीची लढत होत आहे. यात प्रामुख्याने भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी ही लढाई असून पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या गड असलेल्या नंदुरबार मतदार संघात मागील दोन पंचवार्षिक निवडणूक पासून भाजपने आपला झेंडा रोवला आहे. आता या मतदारसंघाला पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसला पोषक वातावरण असून भाजपा विरुद्धच्या नाराजीचा आणि भाजपातील अंतर्गत नाराजीच्या फायदा काँग्रेसला होणार आहे. त्यात दिवसेंदिवस त्यांना विविध संघटनांच्या पाठिंबा मिळत आहे. 

आरपीआय आठवले गटाच्या गोवाल पाडवी यांना पाठिंबा 

नंदुरबार जिल्ह्यातील आरपीआय आठवले आदिवासी आघाडीच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. याबाबत त्यांनी पत्र देऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यात असे नमूद केले आहे की गेल्या दहा वर्षात केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही विरुद्ध धोरणे वंचित शोषित आदिवासी दलित घटकांच्या बाबतीत घेतली असून त्यातील अमान्य बाबी लक्षात घेता हे सरकार सर्वसामान्यांच्या विचार करणारे नाही, आदिवासींच्या हक्क लावले जात आहेत, म्हणून आपल्या हक्काचा आवाज उच्चशिक्षित अभ्यास असलेले प्रतिनिधी संसदेत पाठवण्यासाठी आदिवासी समाजाची बाजू आक्रमकपणे मांडण्यासाठी दिल्ली दरबारी आदिवासी विरोधी धोरणांच्या प्रतिकार करता येईल यासाठी लोकशाहीचे मूल्य जपणारा प्रतिनिधी संसद संसदेत पाठवायच्या आहे या विचाराने आरपीआय आठवले आदिवासी आघाडी तर्फे आपल्याला जाहीर पाठिंबा देत आहोत असे पत्र देण्यात आले आहे. सदरचे पत्र श्री संदीप देवरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या सह्यांसोबत दिले आहे.

आदिवासी संघटना बिरसा आर्मीच्या गोवाल पाडव्यांना पाठिंबा 

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आम्ही बिरसा आर्मी या संघटनेच्या माध्यमातून आपणास जाहीर पाठिंबा देत आहोत असे पत्र आमदार के सी पाडवी तथा माझी आदिवासी विकास मंत्री व लोकसभेचे उमेदवार पाडवी यांना देण्यात आले आहे. त्यात नमूद करण्यात आले आहे की दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी जिल्हास्तरीय बिरसा आर्मी पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली त्या दिवशी सर्वांमध्ये महाविकास आघाडीचे काँग्रेसचे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे अधिकृत उमेदवार म्हणून आपणास पाठिंबा देण्याचे सर्वांना मते ठरले आहे. त्यामुळे आम्ही आपणास सदरच्या पाठिंबा देत आहोत असे नमूद केले आहे. सदरच्या पत्रावर जिल्हाध्यक्ष भरत पावरा अक्कलकुवा तालुका अध्यक्ष प्रवीण पाडवी शहर सचिव तळोदा सतीश पाडवी , अक्कलकुवा तालुका अध्यक्ष मानसिंग पाडवी मेंडवर शाखा अध्यक्ष रजनीश वसावे अजय पाडवी इत्यादी पदाधिकाऱ्यांनी सह्या केल्या आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने