धुळे तालुका पोलीसांनी सिमावर्ती तपासणी नाक्यावर रोखली अवैधरित्या गुटखा तस्करी
धुळे - लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 पार्श्वभुमीवर संपूर्ण धुळे जिल्हयात सिमावती भागात विविध ठिकाणी तपासणी नाके कार्यान्वीत करण्यात आले असुन त्या ठिकाणी जिल्हयातून पर जिल्हयात येणा-या जाणा-या वाहनांची कसुन तपासणी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने दिनांक-14/04/2024 रोजी पोलीस निरीक्षक श्री प्रमोद पाटील, धुळे तालुका पोलीस ठाणे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सुरत येथून ट्रक क्रमांक-MH-43-E-2169 मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला विमल पान मसाला व सुगंधीत तंबाकूचा माल भरुन कुसुंबा मार्गे मालेगांव कडे जात असल्याची माहिती मिळाल्यावरुन मा. पोलीस अधीक्षक, धुळे श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे, उप-विभागीय पोलीस अधिकारी श्री. साजन सोनवणे यांना घटनेची माहिती देवून वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, पोउनि महादेव गुट्टे, पोहवा कुणाल पानपाटील, पोका विशाल पाटील, पोकों कुणाल शिगाणे, पोकों- धिरज सांगळे, पोहवा रविंद्र राजपूत अशांनी तात्काळ अजनाळे गावाचे शिवारात खान्देश कॅरीअर अॅकेडमी समोर कुसुंबा ते मालेगांव रोडवर सिमावर्ती तपासणी नाक्यावर सापळा रचला त्याप्रमाणे आज दिनांक- 14/04/2024 रोजीचे 09.00 वाजेच्या सुमारास नमुद ट्रक क्रमांक MH-43-E-2169 येतांना दिसली तेव्हा पोलीस पथकाने नमुद वाहनांस चांबवून चौकशी केली असता त्यात चालक वाहीद आरीफ पिंजारी रा. मालेगांव जि. नाशिक व क्लिनर शोएब खान मुजीब खान रा. मालेगांव जि. नाशिक यांना विचारपूस करता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु बातमीची खात्री करण्यासाठी पोलीस तपासणी पथकाने सोबतच्या पंचांसमक्ष वाहनाची कसून तपासणी केली असता नमुद ट्रक मध्ये साडया व इतर गारमेंट मालाचे आडोशाला 10,62,874/- रुपये किंमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला विमल पान मसाला व सुगंधीत तंबाकूचा माल व टूक मिळून आला असुन नमुद गुटखा तस्करीच्या प्रकरणात धुळे तालुका पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक-294/2024 भादवि कलम 328 बगैरे गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. व नमुद प्रकरणाचा पुढील तपास पोउनि महादेव गुट्टे करीत आहेत.
अशा प्रकारे लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 चे अनुषंगाने आदर्श आचार संहिता राबवितांना पोलिसांनी यशस्वी कारवाई केले आहे.
