कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीच्या खून डोळ्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना




कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीच्या खून 
डोळ्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना 

धुळे -

कौटुंबिक वादातून पतीने तीक्ष्ण हत्याराने पत्नीच्या गळ्यावर वार करून खून केल्याची घटना शनिवारी (ता. १३) दुपारी दोनच्या सुमारास देवपूरमधील नकाणे रोडवर घडली. घटनेनंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या संशयित पतीला पोलिसांनी अवघ्या काही वेळातच ताब्यात घेतले.

त्याने या प्रकारानंतर विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली. देवपूरमध्ये अनिता हिरा बैसाणे (वय ४०, रा. फुले कॉलनी) वास्तव्यास आहेत. त्या धुणी- भांडी करतात. त्यांच्यात व पती हिरामण वाल्मिक बैसाणे (वय ४९) यांच्यात नेहमी कौटुंबिक वाद होत होते. 

शनिवारी दुपारी अनिता बैसाणे या काम करून घरी जात असताना पती हिरामण बैसाणे याने त्यांना पांझरा नदी किनारच्या समांतर रस्त्यावर छत्रपती हॉस्पिटलच्या पाठीमागे अडविले. तसेच मारहाण करुन चाकूने अनिता बैसाणे यांचा गळा चिरला. यात अनिता बैसाणे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर हिरामण बैसाणे याने पळ काढला. 

नंतर तो जवळच लपून बसला होता. घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. घरगुती वादातून संशयित पती हिरामण बैसाणे याने पत्नी अनिता बैसाणे यांच्या गळ्यावर वार करून खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक एस. ऋषीकेश रेड्डी.

पश्‍चिम देवपूरचे पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाट, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत पारधी, धर्मेंद्र मोहिते, चंद्रशेखर नागरे, पुरुषोत्तम सोनवणे, दीपक गायकवाड, मनोहर पिंपळे, सुनील राठोड, नरेश मराठे, बंटी साळवे व पथकाने पाहणी केली. याप्रकरणी उशिरापर्यंत पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने