*आर.डी.एम.पी.हायस्कूल व ज्यू.कॉलेजची मतदान जनजागृती रॅलीसह, पथ नाट्य सादर*
दोडाईचा (मुस्तफा शाह)
दोंडाईचा मतदार जनजागृती स्विप कार्यक्रम* लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव, गोयलसो , तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळेसो,यांच्या मार्गदर्शनानुसार,गटविकास अधिकारी आर.डी.वाघ, स्वीप नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी डॉ.सी.के. पाटील यांच्या नियोजनानुसार शिंदखेडा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कार्यक्रम गावात, वार्डात प्रभावीपणे सुरू आहेत, दोंडाईचा येथील स्वो.वि संस्थेचे,आर डी एम पी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एस के चंदने यांच्या दिग्दर्शनानुसार विद्यालयाचे इयत्ता पाचवी ते अकरावीचे विद्यार्थी यांनी शाळेपासून तिरमलीवाडा, गोपालपुरा, कृष्ण मंदिर, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथपर्यंत मतदार जनजागृती प्रचारफेरी काढण्यात आली, यावेळी *'मतदार राजा जागा हो,लोकशाहीचा धागा हो'* अशा विविध घोषणा देण्यात आल्यात. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात अकरावीच्या विद्यार्थिनींनी *मतदान जागृती या विषयावर पथनाट्य* सादर केले.
यावेळी प्राचार्य एस के चंदने, प्रा.जी वाय बोरसे, प्रा बी जी शिंदे, प्रा आर टी भावसार, क्रिडा शिक्षक एन एस पाटील व ई एन बडगुजर, कलाशिक्षक राजन मोरे, यू के पाटील, मनोहर कापुरे, प्रशांत भामरे, कविता पाटील, रीना गिरासे,आर डी पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते विजय मराठे, रामभाऊ माणिक, कृष्णा नगराळे, भरतरी ठाकूर, रवि महाले, रवी अहिरे आदि मान्यवर उपस्थित होते. या वेळी मोठ्या प्रमाणात ,युवक, युवती, वयोवृध्द,दिव्यांग महीला, पुरुष मतदार उपस्थितीत होते.सर्वांनी आम्ही मतदान करणारच अशी प्रतिज्ञा ही घेतली.
