पेट्रोल ५० दिवसात स्वस्त करणार होते, दीडपट वाढवले, लोकांनो पाकीटमार कोण ते शोधा :शरद पवार




पेट्रोल ५० दिवसात स्वस्त करणार होते, दीडपट वाढवले, लोकांनो पाकीटमार कोण ते शोधा :शरद पवार


 पुणे - बारामती च्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे  लक्ष लागून आहे. या निवडणुकीत शरद पवार विरुद्ध मोदी असा सामना होत आहे. राजकारणात ज्यांची चाणक्य म्हणून ओळख आहे त्याच पवारांचा पक्ष फोडण्याचा भाजप वर आरोप आहे.  त्यामुळे फक्त पक्ष नाही फुटला तर पवार कुटुंब फुटले आहे.  आणि आता बारामतीतील पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. या सामन्याला आता पवार विरुद्ध मोदी असे पाहिले जात आहे.

बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे  प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. येथील मारुती मंदिरात ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते नारळ वाढविण्यात आला. यावेळी आमदार रोहित पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते.

 दहा वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, पेट्रोलचे भाव ५० दिवसांत खाली आणतो. ५० दिवसांत दर खाली आले नाहीत पण भाव दीडपट वाढले. यांनी पेट्रोल, डिझेल महाग केले आणि साखर, दूध स्वस्त केलं. तुम्ही जे पिकवता ते स्वस्त केलं आणि दुसरे पिकवतात त्यासाठी तुमच्या खिशातून पैसे काढले काढले.  सांगतात की सगळ्यांच्या खिशात काही हजार रुपयांची रुपये टाकले. मात्र पैसे घालायचे एका खिशा आणि खालच्या खिशातून काढून घ्यायचे आणि तेही डबल काढून घ्यायचे, आता ही पाकीटमारी बंद करायची की नाही? आणि पाकीटमारी बंद करायची असेल तर हा पाकीटमार कोण? याचा शोध घ्यावा लागेल आणि त्यांना बाजूला करावे लागेल, असा घणाघाती हल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चढवला.


बटन कस दाबायच ते मी सांगणार नाही"

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका मेळाव्यात ईव्हीएम मशीनमध्ये कचाकचा बटन दाबा. आपल्या भागाला निधी कमी पडू देणार नाही, असे वक्तव्य केले होते. हाच धागा पकडत शरद पवार म्हणाले की, "आपल्याला वाद वाढवायचे नाहीत. संघर्ष वाढवायचा ना आपल्याला मनापासून काम करायचे आहे आणि हे काम करत असताना तुतारीचे बटन दाबा. काल कुणीतरी सांगितले की, बटन कसं दाबायचं. ते मी सांगणार नाही" पवारांच्या या क्तव्यानंतर एकच हशा पिकला.

बटन असं दाबलं की तुम्हाला काही कमी पडणार नाही. या खोलात मी जाऊ इच्छित नाही मात्र... देणे घेणे करून मते मागण्याची आमची भूमिका नाही. इथे काम करायचे, लोकांना शक्ती द्यायची, लोकांची सेवा करायची आणि मते मागायची ही आमची भूमिका आहे, अशा शब्दांत शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वक्तव्याचा समाचार घेतला.

त्यामुळे देशातील महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यावर भाजप कडे कोणतेच उत्तर नाही. तोडा फोडा आणि राज्य करा आणि देशाला  लुटा का राजमंत्र घेऊन मोदी  काम करत आहेत.

या सर्व मुद्यावर शरद पवार यांनी खरपूस समचार घेतला. व राजकीय टीका केली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने