दीपक गिरासे यांच्या पाठपुराला यश सिंचन विहिर मजुरांना मजुरीची मोठी रक्कम वितरीत...
दोडाईचा (अख्तर शाह )
शिंदखेडा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीचे काम सुरू केली आहेत काम सुरू झाल्यावर मजुरांच्या नावे मजुरीची रक्कम मिळत नसल्याने मोठे अडचण निर्माण शेतकऱ्यांना झाली होती त्यामुळे सिंचन विहरीची कामे मोठ्या प्रमाणात थांबली होती मजुरांवर व शेतकऱ्यांवर आलेली अडचण निवारण करण्यासाठी व पावसाळ्याच्या आधी विहिरीचे खोदकाम बांधकाम पूर्ण व्हावे जेणेकरून पुढे शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही याची काळजी डोळ्यासमोर ठेवून दीपक गिरासे यांनी गेल्या पंधरा दिवसात पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेब यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे सविस्तर या विषयाची मांगणी केली होती त्यावर पवार साहेबांनी आश्वासन दिले की लवकरात लवकर शेतकऱ्यांची अडचण आम्ही दूर करू तसेच सूचनाही देऊ आणि वरिष्ठ कार्यालयाशी संवाद साधून तालुक्यातील मजुरांची व शेतकऱ्यांची अडचण कळवली गेली होती त्यावर मंत्री महोदयांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून मजुरीची निधी तात्काळ वितरित करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आज तालुक्यात दीपक गिरासे यांच्या पाठपुरामुळे मजुरांच्या नावावर रक्कम निघायला सुरुवात झाली
या मजुरांच्या निधीमुळे रखडलेल्या शेकडो सिंचन विहिरींचे काम पुन्हा गती घेतील अशी माहिती दीपक गिरासे यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली त्यांनी माहिती देताना सांगितले ज्या शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीचे प्रस्ताव पंचायत समितीला सादर केले होते परंतु सिंचन विहिरीचे आजपर्यंत कार्यारंभ आदेश मिळाले नाहीत अशा शेतकऱ्यांना आचारसंहिता संपल्यानंतर विहीर मिळवून न्याय मिळवून देण्यासाठी पुन्हा पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली मजुरांची निधी वितरणमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे..
