शिरपूर फर्स्टचे नंदुरबार लोकसभा खासदार हीना गावित यांना निवेदन
गुजरात अंकलेश्वर पासून तर मध्यप्रदेश बुऱ्हाणपूर पर्यंत महाराष्ट्राच्या धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग. गेल्या अनेक वर्षांपासून याची परिस्थिती बिकट आहे, २०१९ मध्ये ह्या महामार्गाला 'राष्ट्रीय महामार्गचा' दर्जा देण्यात आला. नुकताच काही महिन्यांपूर्वी NH753B म्हणून ओळखला जाणार अंकलेश्वर-बुऱ्हाणपूर महामार्ग चौपदरीकरण होणार आहे असा आदेश सरकारने दिला आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील हा महामार्ग तऱ्हाडी ते शिरपूर आणि शिरपूर ते तोंदे ह्या मार्गे जातो. पण आजची याची परिस्थितीत चिंताजनक आहे ह्यामुळे रोज अपघाताचे आकडे वाढत आहे. तालुक्यातील जनता ह्यामुळे त्रस्त झाली आहे . अंकलेश्वर बुऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होईपर्यंत आहे, त्या रस्त्याची दुरुस्ती व्हावी जेणेकरून अपघात टळतील व लोकांचा प्रवास सुखमय होईल, असे शिरपूर फर्स्ट च्या वतीने नंदुरबार लोकसभेचे खासदार हिना गावित यांना निवेदन करण्यात आले.
हीना गावित शिरपूरच्या दौऱ्यावर असताना शिरपूर फर्स्ट च्या वतीने त्यांना निवेदन करण्यात आले यावेळी शिरपूर फर्स्टचे पार्थ राजपूत, पुष्पक जैन उपस्थित होता..
