मना-मनातील संपवा अढी* *मनी उभारा आनंदाची गुढी*

 



९ एप्रिल : गुढीपाडवा* 

*मना-मनातील संपवा अढी*
*मनी उभारा आनंदाची गुढी*

✍️ रणवीर राजपूत* 
*प्रसिद्धी प्रमुख,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष/डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन,म.राज्य*

*गुढीपाडवा म्हणजे* 
*हिंदू नववर्षाचा शुभारंभ*!*हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने,या दिवशी नव्या कामांची मुहूर्तमेढ केली जाते.इतकेच नव्हे तर,नव वर्षात एखादं सत्कार्य करण्याचा संकल्पही केला जातो.बंधू-भगिनींनो,
याशिवाय *गुढी उभारणं* हे एक विजयाचं प्रतिकही आहे.

एका आख्यायिकानुसार *भगवान श्री विष्णू यांनी प्रभू रामचंद्राचा अवतार* *घेत युद्धात दशमुखी रावणाचा रणांगणावर पराभव* करून वध केला.त्यानंतर श्रीराम यांनी चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी अयोध्यानगरीत प्रवेश केला.त्याप्रसंगी 
अयोध्यावासियांनी घरोघर गुढ्या-तोरणे उभारून प्रभुरामाचे वाजत-गाजत भव्यदिव्य स्वागत केलं.वास्तवात त्यादिवशी जागोजागी गुढ्या उभारुन विजयोत्सव साजरा केला.या पार्श्वभूमीवर चला तर,आपण सर्वजण ९ एप्रिल चैत्र शुक्ल १ या दिवशी 
प्रभातकाळी आपापल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला गुढी उभारून नववर्षाचा आनंदोत्सव साजरा करूया.
अत: आपणा सर्वांना हे नूतन वर्ष सुखाचे,समृद्धीचे व आरोग्यदायी जावो,ह्या भगव्या शुभेच्छा!

गुढीपाडवा साजरा 
करण्यामागे आणखी एक आख्यायिका आहे,ती म्हणजे *ब्रम्हदेवाने ही सृष्टी चैत्र शुक्ल प्रतिपदेला निर्माण केली*,असे पुराणकाळात वर्णिले गेले अन् या दिवसापासूनच खऱ्या अर्थाने *कालमापन* सुरू झाले.
मराठी माणसाच्या दृष्टीने या दिवसाला अनन्यसाधारण आध्यात्मिक महत्व आहे.
याशिवाय असेही म्हटले जाते की,*शालिवाहन राजाने क्रूर-अत्याचारी अशा शक लोकांचा पराभव* करून रयतेची त्यांच्या जाचापासून मुक्तता केली.या पार्श्वभूमीवर विजयाचे प्रतिक म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून शालिवाहन शकाचा प्रारंभ होतो.त्याचं प्रतिक म्हणून गुढ्या उभारुन त्याचा विजयोत्सव साजरा केला जातो.

*गुढीपाडवा* म्हणजे खऱ्या अर्थानं मराठी जनमानसासाठी नव वर्षाचा शुभारंभ होय.ह्या दिवशी  निवासस्थान/परिसराची स्वच्छता करणं अभिप्रेत असते.तसेच पहाटे उठून अभ्यंगस्नान करून नवे वस्त्र परिधान करतो.याप्रसंगी गृहिणी घरासमोर रांगोळी काढतात.घराच्या प्रवेशद्वाराला आंब्याच्या झाडाच्या पानांचे तोरण बांधले जाते.त्यानंतर देवांची व कुलदेवतेची मनोभावे 
पूजाअर्चा करतात.मग गुढीची काठी स्वच्छ धुऊन काढत,त्या काठीच्या टोकाला साडी,फुलांची माळ,कडुलिंबाची छोटीशी डहाळी,साखरपाकाची माळ घालून त्यावर तांब्याचे पात्र पालथे ठेऊन ते घट्ट बांधतात. त्यानंतर ती गुढी प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बांधतात.गुढीची पूजा करताना *ओम श्री ब्रम्ह ध्वजश्य  नम:* हा मंत्र उच्चारून आपण सर्वजण नमस्कार करतो.पूजाअर्चा झाल्यावर कडुनिंबाची कोवळी पानं,जिर,ओवा,साखर वा गूळ यांचे मिश्रण प्रसादाच्या रूपात थोडं थोडं प्राशन करतो.आपणा सर्वांना महत्वाची सूचना अशी आहे की,संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी सर्वांनी आपापली गुढी खाली उतरून घ्यावी.

बंधू भगिनींनो,या दिनाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे नव वर्षाला सर्वांनी एकमेकाविषयी असलेली मना-मनातली अढी काढून,स्नेहाची,
आपुलकीची व सदभावाची गुढी उभारावी.त्यातून आदर्श  राज्यासह देशाची उभारणी  करण्यास हातभार लागतो. तात्विक *मतभेद* असू शकतात,पण कोणत्याही परिस्थितीत 
आपापसात *मनभेद* होणार नाहीत,यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. 

या मंगलमय दिनी आपण कडुनिंबाची पानं अन् 
साखरपाकचे मिश्रण खाण्यामागे एक भावना असते.मानवी जीवनात ज्या काही गोड तर,काही कटू अनुभव येत असतात,ते पचविण्याची ताकद निर्माण करण्यासाठी हे मिश्रण खाल्ले जाते.म्हणजेच सहनशील व्हा.चला तर,आपण सर्वजण नववर्षाची सुरुवात मागच्या काळातील सर्व कटू अनुभव,आपापसातील दुरावा-मतभेद विसरून,नव्या गोडव्याने,नव्या उत्साहाने नूतन वर्षात सामाजिक एकोपा दृढ करण्याचा संकल्प करूया.

प्रभू रामचंद्राने जसा रावणाचा वध करून समाजातील दुष्टप्रवृत्तींचा समूळ नाश केला,त्याप्रमाणेच
देशातील भ्रष्टाचाररुपी राक्षसाचा नायनाट करण्याकरिता आपण सर्वजण एकसंध होऊया! त्याप्रमाणेच नववर्षाच्या प्रहरी रक्तदान,नेत्रदान,रुग्णसेवा, देहदानचा संकल्प करूया! राज्यातील तमाम नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!जय🚩श्रीराम!

*✍️ रणवीर राजपूत* 
*प्रसिद्धी प्रमुख,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष/डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन,म.राज्य*
..................................................
*संपादक महोदय*
कृपया आपल्या वृत्तपत्रात सदर लेख दि.९ एप्रिल रोजीच्या अंकात प्रसिद्ध करावा,ही विनंती.🙏

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने