आपला मुलगा उच्च अधिकारी व्हावा ही आईची इच्छा.मुलगा झाला न्यायाधीश.
प्रभाकर आडगाळे मालपुर प्रतिनिधी.
दोंडाईचा येथील एका मराठा. कुटुंबातील अमोल हे.झाले न्यायाधीश.हे वार्ता जेव्हा अमोलच्या कानी आले तेव्हा अमोलला सुद्धा आकाश ठेंगणे झाले होते आईचे स्वप्न पूर्ण झाले हे देखील आईला आनंद असो बापाचा तर आनंद अश्रू गगनात मावेनात.
असे अठरा विश्व दारिद्र्य असलेले आपला मुलाचा उच्च अधिकारी झाल्याचा आनंदच निराळाच होता.त्याप्रसंगी दोंडाईचा येथील . ज्येष्ठ पत्रकार मनोहर देवरे. सुनील धनगर, दौलत सूर्यवंशी, कैलास राजपूत आधी ज्येष्ठ . पत्रकार बंधूंनी अमोलचा सत्कार करून सन्मान केला.
त्यावेळेस अमोल जी मराठे यांनी सांगितले की आईचे स्वप्न होते की माझा मुलगा एक दिवस उच्च अधिकारी बनवा व ते स्वप्न मी मनात बाळगून आज न्यायाधीश झालो हे पुष्प मी माझ्या आईच्या चरणी अर्पण करतो माझ्या हमाल असलेला कष्टाळू बाप रक्ताचे पाणी करून मला शिक्षण दिलेत त्यांच्या प्रति मी नतमस्तक होऊन त्रिवार वंदन करतो.अशा अमोल मराठे यांचा सर्वत्र परिसरात आनंद व्यक्त करताना दिसत . अशी मोलाची माहिती आमचे प्रतिनिधी श्री प्रभाकर आडगाळे, यांच्याशी बोलतानाव्यक्त केले.
व शेवटी अमोल मराठे म्हणाले की मी गोरगरिबांना सर्वांनाच न्याय देण्याचा प्रयत्न करेन माझ्या आईने सांगितलेला हा कानमंत्र मी लक्षात ठेवीन..
