बेकायदेशीर बियरची चोरटी वाहतूक शहर पोलिसांनी रोखली वाहन व बियर साठासह 16 लाखांचा मुद्देमाल जप्त




बेकायदेशीर बियरची चोरटी वाहतूक शहर पोलिसांनी रोखली 

वाहन व बियर साठासह 16 लाखांचा मुद्देमाल जप्त


शिरपूर - शिरपूर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक श्री. के. के. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दिनांक ०७/०४/२०२४ रोजी बोराडी गावाकडुन बालकुवे विखरण मार्ग शहादाकडे पांढऱ्या रंगाचे आयशर वाहन क्र.जी.जे.२७/टी.१७२५ जाणार असुन तिचेत गुरांचे चाऱ्याचे आड बेकायदेशीररित्या बिअरचे खोके ठेवून बिअरची चोरटी वाहतुक होत असल्याबाबत बातमी मिळाली होती.

त्यावरून पोलीस निरीक्षक श्री. के. के. पाटील यांनी लागलीच शोध पथकाचे अंमलदारांना सापळा लावणेकामी विखरण ता.शिरपूर जि.धुळे येथे पाठविले असता त्यांनी विखरण ता.शिरपुर जि.धुळे येथे दोन पंचांसोबत सापळा लावला असता बलकुवे गावाकडून विखरण गावाकडे गुरांचा चारा भरलेले पांढऱ्या रंगाचे आयशर वाहन येतांना दिसले. सदर वाहनाचा क्रमांक पाहता तो जी.जे.२७/टी.९७२५ असा असल्याने त्यावरून सदरचे वाहन हे बातमीतील असल्याची खात्री झाल्याने त्यांनी वाहन चालकास वाहन थांबविण्याचा इशारा केला असता त्याने त्याचे वाहन न चांबविता तो शहाद्याचे दिशेने वेगाने वाहन चालवून नेत असल्याने त्याचा पाठलाग केला असता २१.५० वाजेचे सुमारास वाहन चालकाने त्याचे ताब्यातील आयशर बहन वरुळ ता. शिरपूर जि. धुळे गावाचे अलिकडे रस्त्यालगत खाली उतरवून वाहन सोडून अंधाराचा फायदा घेवून पळुन गेला. त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. सदरचे वाहन शिरपूर शहादा रस्त्यावर आणून सदर वाहनाची पंचांसमक्ष झडती घेता सदर वाहनात गुरांचे चान्याचे आडोशास पुठ् ठ्याचे खोके त्यात टीन बिअरचा माल भरलेले मिळून आले त्यांचे वर्णन व किमत पाहता ते खालील प्रमाणे, १५,००,०००/- रूपये किंमतीचे आयशर वाहन क्र. जो.जे.२७/टो.९७२५ पांढऱ्या रंगाचे जू.वा.कि. अं. ,०१,५८,४००/-
रुपये किमतीचे ६० पुठ्‌ठ्याचे खोके प्रत्येक खोक्यामध्ये पॉवर कुल स्ट्रॉग टीन बिअरचे ५०० मिलीचे २४ नग प्रत्येकी नग ११०/-रूपये किंमत असलेले व त्यावर सेल ईन मध्य प्रदेश ओनली असे नमूद असलेले त्यावर एका बाजूस बॅण्डरोल लावलेला बॅण्डरोलवर एफ. एल. एम.पी. व क्रमांक, बारकोड नमुद असलेला रुपये किंमतीचे १० पुठ्ठ्याचे खोके प्रत्येक खोक्यामध्ये BUDWEISER०.० कंपनीचे टीन बिअरचे ३३०
२३,७६०/- मिलीचे २४ नग प्रत्येको नग ९९/- रूपये किमत असलेले
एकुण-१६.८२.१६०/- रुपये किंमत अंदाजे.

वरप्रमाणे ०१.८२,१६०/- रू.कि.चा बिअर माल व १५,००,०००/- रु. कि.चे आयशर वाहन क्र. जी.जे. २७०टो.९७२५ सह एकूण १६.८२.१६०/-रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

वरील बाबत पोकों/अनिल अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरपूर शहर पो.स्टे.ला महाराष्ट्र प्रोव्हिविशन कायदा कलम दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास मपोउनि छाया पाटोल करीत आहेत.

६५(अ) (ई),८०(१) (२).८३ प्रमाणे गुन्हा सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री.किशोर काळे तसेच प्रभारी उप विभागीय पोलीस अधिकारी तथा शिरपूर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक श्री. के. के. पाटील, तसेच मपोउनि छाया पाटील, डी.बो. पथकाचे पोहेकॉ ललीत पाटील, पोना/शिरीष भदाणे, शाम पवार, रविंद्र आखडमल, पोकों/विनोद आखडमल, योगेश दाभाडे, अनिल अहिरे, भटु साळुंके, सचिन वाघ, आरीफ तडवी, मनोज दाभाडे, मनोज महाजन, अशोक माळी, चापोहेको चिकणे, चापोकों/विजय पाटील, तसेच होमगार्ड शरद पारधी, मिथुन पवार, राम भिल व चेतन भावसार अशांनी मिळून केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने