अवैध मध्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई




शिरपूर प्रतिनिधी -  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठांनी आचार संहिता चे पालन करण्याकरिता सतर्क राहून कारवाईचे आदेश दिले आहेत. 

त्या अनुषंगाने मा.निरीक्षक श्री.ए.पी. मते राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाका, हाडाखेड ता. शिरपूर जिल्हा धुळ कार्यालयास बातमी मिळाली की चार चाकी वाहन मधून मुंबई आग्रा महामार्गावर पनाखेड शिवार पनाखेड ता. शिरपुर जिल्हा धुळे येथून अवैध मद्याची वाहतूक होणार आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाली नुसार दिनांक 25/04/2024 रोजी मध्य रात्रीच्या वेळी पनाखेड उड्डाणपुलाखाली पनाखेड शिवार मुंबई आग्रा महामार्गावर सापळा लावला असता समोरून संशयित वाहन क्रमांक MH 04 BS 4423 हे येत असल्याचे दिसले त्यास थांबण्याचा इशारा केला असता सदर वाहनाच्या चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून वाहन चालक हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. त्यावेळी सदर बाहनाची तपासणी केली असता सदर वाहणामध्ये प्रथम दर्शनी खालीलप्रमाणे मुद्देमाल मिळून आला.

1) रु. 90000/- बंग प्रीमियम STRONG बियर 500 मिलीचे एकूण 30 बॉक्स (प्रत्येकी 24 पत्री टीन असलेले) मध्य प्रदेश राज्यात निर्मित व विक्री साठी असलेले अ.की.रु. 

2)रु. 550000/-मारुतो स्विफ्ट डिझायर कंपनीचे चारचाकी वाहन (वाहन क्रमांक MH 05 BS 4423अ.की.रु.

असा एकूण रु. 640000/- मुद्देमान हस्तगत करण्यात आला.सदरचा मुद्देमाल वाहनासह जप्त करून फरार वाहनचालका विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 अ, ई, 108 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाईश्री.डॉ. विजय सूर्यवंशी साहेब आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मा. श्री. प्रसाद सुर्वे साहेय संचालक (अं. व द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मा.श्री.यू.आर. वर्मा मॅडम वि.उ. आयुक्त नाशिक विभाग नाशिक, श्रीमती. स्वातो काकडे मॅडम अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, यांच्या मार्गदर्शनाखाली
श्री.ए. पी. मते. निरीक्षक, राज्यउत्पादन शुल्क सीमा तपासणी नाका, दुय्यम निरीक्षक श्री.पी.एस धाइने. श्री.एस.ए. चव्हाण, स. दुय्यम निरीक्षक श्री. एस. एस. गोयेकर, जवान. श्री. हेमंत. अ. पाटील, श्री.एस.एच.देवरे, श्री. प्रशांत बोरसे, श्री. मनोज धुळेकर, वाहन चालक श्री निलेश मोरे यांचे पथकाने सदरची कारवाई केलेली आहे. सदर गुन्ह्याची फिर्याद श्री. हेमंत पाटील यांनी दिली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्रीमती स्वाती काकडे मॅडम अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धुळे यांचे मार्गदर्शनाखाली श्री.पी.एस धाईजे दुय्यम निरीक्षक सीमा तपासणी नाका हाडाखेड ता. शिरपूर जिल्हा धुळे हे करीत आहेत. 

तरी जनतेस आवाहन करण्यात येते की, अवेध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री संदर्भात कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास या विभागाचा टोल फ्री. क्रमांक 18002339999 व WHATSAAP न.8422001133 तसेच दूरध्वनी क्र.02562 297484 था क्रमांकावर संपर्क साधावा.












Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने