महाविकास आघाडीचे उमेदवार ऍड. गोवाल पाडवी शक्ती प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल करणार




महाविकास आघाडीचे उमेदवार ऍड. गोवाल पाडवी शक्ती प्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल करणार 

शिरपूर प्रतिनिधी - नंदुरबार लोकसभेचे महाविकास आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार एडवोकेट गोवाल पाडवी हे उद्या दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

यासाठी महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि महाविकास आघाडीला समर्थन देणाऱ्या सर्व संघटना सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते आणि नंदुरबार जिल्हा मतदार संघातील मतदार बंधू यांच्यासह आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जनशक्तीच्या प्रदर्शनासह हा उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे. 

त्यामुळे हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीच्या या लढ्यात जनतेने मोठ्या संख्येने यासाठी उपस्थित रहावे व शक्ती प्रदर्शन व जन समर्थन दाखवत आपली ताकद दाखवावी व महाविकास आघाडीच्या उमेदवारास जाहीर समर्थन द्यावे यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांकडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले आहे. 

महाविकास आघाडीचे उमेदवार एडवोकेट गोवाल पाडवी हे उच्च शिक्षित तरुण उमेदवार आहेत. सध्या भाजप व नरेंद्र मोदींच्या विरोधात सुप्त लाट आहे. त्यामुळे त्यांना मतदारसंघात मोठा पाठिंबा मिळत आहे. 

त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करताना महाविकास आघाडी मोठे शक्ती प्रदर्शन करणार असून याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडी व तसेच पक्षाने नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना व मतदारांना केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने