थाळनेर येथे मतदार जनजागृती रॅली
शिरपूर - शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे दि.26/03/2024 रोजी तहसील कार्यालय शिरपूर, व जे.ए.पटेल विद्यालय, संत गाडगे महाराज विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने थाळनेर गावात मतदार दिनानिमित्त जनजागृती रॅली संपन्न झाली.
भारतातील लोकशाही मजबूत होण्यासाठी "मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो " हे घोषवाक्य घेऊन थाळनेर गावात मतदार जनजागृती प्रभात फेरी व.. मनोहर धनगर चौधरी आणि प्रकाश हिरालाल थोरात यांनी सादर केलेल्या गीतगायनातून जागृती करण्यात आली.
मा. तहसीलदार महेंद्र माळी, यांच्या निर्देशानुसार या कार्यक्रमाचे नियोजन मतदार जनजागृती नोडल अधिकारी सौ. निता सोनवणे यांनी केले .यावेळी जे. ए. पटेल विद्यालय आणि संत गाडगे महाराज विद्यालयाचे विद्यार्थी, सर्व शिक्षकवृंद मुख्याध्यापक अन्नपूर्णा संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्र वाडीले व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
