त्या वाहनात होती डार्लिंग आणि आंटी
गुटखा तस्करिवर शिरपूर तालुका पोलिसांच्या कारवाई
शिरपूर - शिरपूर तालुका पोलिसांनी महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेली सुंगधीत सुपारीची चोरटी वाहतुक करणा-यावर कारवाई. केली आहे. या कारवाई डार्लिंग आणि अँटी कंपनीची स्वीट सुपारी मध्यमालासह पोलिसांनी जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.
दिनांक 28/03/2024 रोजी रात्री 02.00 वाजेचे सुमारास पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मुंबई आग्रा रोडवर इंदौर कडुन शिरपुर मार्गे महाराष्ट्रात येणारी आयशर गाडी क्रमांक एम.एच.12 क्यु. डब्ल्यु. 3224 हिचेत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेली सुंगधीत सुपारी पदार्थाची विना परवाना अवैध रित्या वाहतुक होत आहे.
या बातमीच्या आधारे कारवाई करत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर पळासनेर गावाजवळ लोकसभा निवडणुक -2024 अनुषंगाने लावण्यात आलेल्या चेक पोस्टवर संशयित वाहने तपासणी सुरु असतांना संशयित वाहन क्रमांक एम.एच. 12 क्यु.डब्ल्यू.3224 हे मध्यप्रदेश राज्याकडुन आल्याचे दिसले सदर चे वाहन चेकपोस्ट जवळ आल्यावर सदर संशयित वाहनावरील वाहन चालक नुरमहंमद मेहबुब पठाण वय 49 वर्षे व्यवसाय चालक रा. जाम कोडगांव ता.जि.अहमदनगर यास सदर वाहनात भरलेल्या माला बाबत विचारपुस करता तो उडवाउडवीचे उत्तरे दिले म्हणुन सदर आयशर पोलीस ठाण्यात आणुन दोन पंच बोलावुन त्यांचे समक्ष सकाळी आयशरची ताडपत्री उघडुन पाहता त्यात आयशर वाहनासह 12,96,400/- रुपये किमतीची महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेली आंटी स्वीट सुपारी व डालिंग इलायची स्वीट सुपारी मिळुन आली असुन वाहन चालक नुरमहंमद मेहबुब पठाण वय 49 वर्षे व्यवसाय चालक रा. जाम कोडगांव ता. जि. अहमदनगर याचे विरुध्द श्री. किशोर हिम्मतराव बाविस्कर, अन्न व औषध प्रशासन अधिकारी धुळे यांनी दिलेल्या फिर्याद वरुन शिरपुर तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम 328,188,272,273 सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 चे कलम 26(2) (iv),27 (3)(d), 27 (3)(e), 30 (2) (a),3,59(i) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोसई बाळासाहेब वाघ हे करीत आहेत.
सदर कारवाई मा. श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक, धुळे श्री. किशोर काळे, अपर पोलीस अधीक्षक, धुळे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोसई बाळासाहेब वाघ, असई राजेंद्र काटकर, असई / रफिक मुल्ला, पोहेकॉ/ संदीप ठाकरे, पोहेकॉ/कैलास पवार, पोहेकॉ/ आबा भिल, पोकों/ मनोज पाटील, पोको/ वाला पुरोहित, पोकों/ शिवाजी वसावे, पोकों/ कृष्णा पावरा, यांनी केली आहे.
