घर फोडी चोरी गुन्हयातील 2आरोपी सह सोन्याचे दागिने व लगड हस्तगत
धुळे जिल्ह्यातील देवपूर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाची कारवाई
धुळे प्रतिनिधी - धुळे जिल्ह्यातील देवपूर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने घरपोडी व चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व लग्न हस्तगत करत ३,९०,७८२/- रुपयांच्या मुद्देमाल असत करत यशस्वी कामगिरी केली आहे.
देवपुर पोलीस ठाणे धुळे गुन्हा रजि.नंबर २२८/२०२३ भा.दं.वि. कलम ४५४, ३८०, अन्वये मधील फिर्यादी नामे रमेश हिरामण सावंत वय ५७ वर्ष व्यवसाय सेवानिवृत्त राहणार प्रभुधन ८ (य) लक्ष्मी नगर नवरंग पाण्याचे टाकोमागे देवपुर धुळे यांनी फिर्यादी दिली की, दिनांक २२/०८/२०२३ रोजी १०.४५ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराचे मुख्य दरवाजा व वॉल कंम्पउऊंडचे गेटला कुलूप लावुन पत्नी सौ. सुरेखा सावंत यांना महानगरपालीका धुळे येथे नोकरीचा ठिकाणी सोडणेसाठी गेले होते. फिर्यादी दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास धरी परत आले तेव्ही घराचा मुख्य दरवाजाचे कडीकोडा तुटलेला दिसुन आले फिर्यादी घरात जावुन पाहिले असता बेडरुममध्ये असलेले लोखंडी गोदरेज कपाट व लॉकरचे दरवाजा तुटलेल्या स्थितीत दिसुन आला व लॉकर मध्ये ठेवलेले सोनेचे दागिणं, रोख रुपये, जर्मन देशाचे चलन, असे एकुण ३,९०,७८२/- सोनेचे दागिणे व चांदीचे शिक्के, रोख रुपये व जर्मन देशाचे चलन घरफोडी करुन फिर्यादीचे संमतीवाचुन लबाडीचे इरादयाने घरफोडी करुन चोरुन नेले बाबत दिलेल्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल आहे.
प्रस्तुत गुन्हयाचे तपास कामी पोलीस निरीक्षक श्री.धनंजय व्हि.पाटील, देवपुर पो.स्टे. यांनी तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक राजेश एस. इंदवे व शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांना कोतवाली पोलीस ठाणे जिल्हा परभणी कडील चोरीचे गुन्हयात न्यायालयीन कोठडीत परभणी कारागृहात दाखल दाखल असलेला बंदोस्त आरोपी नामे आरोपी खय्युम रफिक बेग वय २२ वर्ष राहणार कुर्बान अलिशाह नगर, छोटी दर्गा रोड, परभणी याचे तपासात परिस्थितीजन्य पुरावे वरुन गुन्हयात ताबा घेणे बाबत आदेशीत केले. त्याप्रमाणे पो.स.ई.राजेश एस.इंदवे व शोध पथकाचे पो. अंमलदार यांनी परभणी जि. परभणी कारागृह येथे जावून आरोपी खय्युम रफिक वेग यास ताब्यात घेतले आरोपीस मा. धुळे न्यायालयात हजर करुन ०५ दिवस पोलीस कोठडी मिळालयाने आरोपीस गुन्हयाचा तपास कामी सखोल विचारपुस केली असता त्यांने गुन्हयाची कबुली सदर आंरोपी व त्याचा साथीदार शेख शफीक शेख हमीद वय २८ वर्ष राहणार कुर्बान अलिशाह नगर, छोटी दर्गा रोड, परभणी अशांनी सोन्याचे दागिणे हिस्सा वाटणी करुन परभणी येथील वर्गवेगळ्या सोनार दुकानावर विक्री केल्याचे सांगितले. परभणी येथे जावून आरोपी शेख शफीक शेख हमीद बास ताब्यात घेवुन पुन्हा पोलीस कोठडी घेण्यात आली व दोघेही आरोपीना परभणी येथे नेवुन गुन्हयातील गेला माल सोन्याचे दागिणे घेणार सोनार दुकानावर जावून विचारपूस करता सोन्याचे दागिणे घेतल्याचे व काही दागिण्याचे लगड (सोन्याची गोळो) करुन ठेवल्याचे सांगितले व गुन्हयातील गेला माल काढून दिला त्यात सोन्याचे (१) १,०१,१६०/- मोहन माळ (सोन्याची गोळी) (२) १,१८,०६०/-रुपये किची १६.१० ग्रॅम वजनाचे ०३ अंगठी, (३) १,७३,४६०/- रुपये किचे सोन्याची मंगलपोत २८.९१० ग्रॅम वजनाची (४) ६०,०००/- रुपये किची नेकलेस १० ग्रॅम वजनाचे असा एकूण ४,५२,६८०/- किमतीचे सोनेचे दागिणे परभणी येथील सोनार दुकानावरुन हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गुन्हयातील आरोपी खय्युम र फीक वेग रा.परभणी व त्याचे इतर साथीदार यांच्या विरुध्द घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार असुन त्यांने परभणी जिल्हा, जळगांव चाळीसगांव, गांधी गंज (विदर), कर्नाटक बेलगांव, हैद्राचाद, जिल्हा हिंगोली, इत्यादी जिल्हा व राज्यामध्ये घर फोडी करुन चोरी केली असुन परभणी जिल्हयातील रेकार्ड वरील गुन्हेगार आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. उपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे, मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. ऋयोकेश रेडडी, धुळे शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक श्री. धनंजय व्हि. पाटील, पो. उप निरी. राजेश एस. इंदवे, शोध पथकातील अ.स.ई. मिलींद सोनवणे, पोहेकी पंकज चव्हाण, पो.हे.को. विनोद पारोळेकर, पो.कॉ. राहुल गुजाळ, पो.कॉ. सौरभ कुटे, पो. को. भटेद्र पाटील, होम विवेक नेत्तकर, अशांनी मिळून केली आहे.
