*नंदूरबार लोकसभाश्रॆत्रात पर्यटन विकास करणार:-सुशिलकुमार पावरा*
*लोकप्रतिनिधींना आशिर्वाद देण्याऐवजी शिव्या देतात भाविक ?*
शहादा. नंदूरबार लोकसभाश्रॆत्रात पर्यटन विकास करून रोजगार उपलब्ध करून देणे,हे आमचे अकरावे ध्येय आहे या मतदारसंघात तोरणमाळ हे महाराष्ट्रातील दुस-या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे.ते ठिकाण दुर्लक्षित आहे.तोरणमाळला जायला रस्ते बरोबर नाहीत, तेथे जाण्यासाठी वाहने उपलब्ध नाहीत,बस सुद्धा कधी मधी जाते.तेथे राहण्याची सोय नाही,पाहिजे तसे रिसाॅर्ट नाहीत, हाॅटेल नाहीत ,अशा असुविधांमुळे या ठिकाणी पर्यटक येत नाहीत.येथे हाॅटेल, रिसाॅर्ट, बगिचे, चांगले रस्ते,वाहनांची सोय, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय केल्यास पर्यटक मोठ्या प्रमाणात येतील व स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होईल. सारंगखेडा मध्ये दत्त जयंती निमित्त दरवर्षी चेतक फेस्टीवल भरतो,यात्रा भरते. देश विदेशातून लाखो लोक या यात्रेला येतात, परंतु राहण्याची व खाण्याची असुविधा, परिसर विकसित झाली नाही,हे ठिकाणही दुर्लक्षित आहे. आदिवासी कुलदैवता याहा मोगी मातेचे दाब येथे देवस्थान आहे.हे देवस्थान सुद्धा विकसित करण्यात आले नाही.परिसरात राहण्याची व खाण्याची असुविधा आहे.
अस्तंबा येथे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येतात. परंतु धडगांव हून अस्तंबा येथे जायला रस्ता खूपच खड्डेमय आहे. विद्यमान आमदार के.सी.पाडवी यांच्या असली या गावाला लागून हे अस्तंबा हे ठिकाण आहे. खड्डेमय रस्त्यावरून वाहने चालवतांना भाविक लोकप्रतिनिधींना आशिर्वाद देण्याऐवजी शिव्या देतात. रस्त्याबाबत प्रचंड नाराजी या भागातील लोकांमध्ये आहे.रस्त्याच्या बाबतीत हे ठिकाण वर्षानुवर्ष लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्षित आहे. जिल्ह्य़ात दहेल, बिलगाव, तिनसमाळ, वार्ली,प्रकाशा अशी पर्यटन स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळेही दुर्लक्षित आहेत.शिरपूर तालुक्यातील क्रांतीकारक खाज्या नाईक यांच्या स्मृतिस्थळी जाणारा रस्ताही दुर्लक्षित आहे.ही सगळी स्थळे विकसित केली तरी लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. लोकांचे स्थलांतर थांबू शकते. जिल्ह्यात एवढे मंत्री,खासदार, आमदार, नेते झालेत यांनी कधीच या मतदारसंघातील पर्यटन स्थळे विकसित करावीत,असा विचार केला नाही.परिणामी लोकांना रोजगार उपलब्ध नाहीत, म्हणून येथील आदिवासी बांधव नाईलाजास्तव गुजरात,स्वराष्ट्र, पंढरपूर अशी ठिकाणी दरवर्षी मजूरीसाठी , ऊसतोडण्यासाठी जातात. पर्यटन स्थळे विकसित करून रोजगार उपलब्ध करून देण्याची इच्छाशक्ती आमच्यात आहे.नंदूरबार लोकसभाश्रॆत्रात पर्यटन स्थळे विकसित होऊन तुम्हाला व तुमच्या मुलांना रोजगार हवा असेल तर मला व माझ्या बिरसा फायटर्स टिमला अवश्य सपोर्ट करा.अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केली आहे.
