अफिम ची बेकायदेशीर वाहतुक करणाऱ्या वाहनावर शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई




अफिम ची बेकायदेशीर वाहतुक करणाऱ्या वाहनावर शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई

शिरपूर प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिरपूर तालुक्यात शिरपूर तालुका पोलिसांनी राष्ट्रीय राजमार्गावर व आपल्या हद्दीतील इतर ठिकाणी तपासणी नाके उभे करून चोक बंदोबस्त ठेवला आहे. बातमीच्या आधारे कारवाई करत लसणाच्या गोण्यांच्या आड अफिम ची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून मुद्देमाल जप्त करत पुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत दि. 29/03/2024 रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनिय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली होती की, मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा कडून शिरपुर मार्गे पिकअप वाहन क्र. MP 13, GB 3525 वरील चालक हा त्याचे स्वतःचे आर्थिक फायदयासाठी त्याचे पिकअप वाहनातून मानवी मेंदूस परिणाम करणारे प्रतिबंधित अफुचे सुकलेले बोंडे (डोडा) व अफिम ची बेकायदेशीर वाहतुक करुन घेवून जात आहे. 

या बातमीच्या आधारे पोलीस पथक नियुक्त करून  चेकपोस्टवर नाकाबंदी दरम्यान वाहने चेक करीत असतांना बातमी प्रमाणे पिकअप वाहन क्र. MP 13, GB 3525 हे येतांना दिसले. वाहनावरील चालकास वाहन थांबविण्याचा ईशारा केला असता सदर वाहन चालक याने त्याच्या ताब्यातील वाहन थांबविले. वाहन चालक यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव (1) कृपालसिंग उमेदसिंग राजपुरोहीत वय 35 वर्षे रा. गाव डोली ता. पाचपदरी जि. बारमेर (राजस्थान) ह.मु. नाकोडा स्वीट येवला जि. नाशिक (2) रघुनाथसिंग कचरुसिंग गुजर वय 21 वर्षे रा. आनेडाता. सोहासरा जि. मन्सुर (मध्यप्रदेश) असे सांगीतले. सदर वाहनात भरलेल्या मालाबाबत विचारपुस केली असता त्यांनी कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तरे दिले नाही. करीता राजपत्रित अधिकारी व पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनात लसुन भरलेल्या गोण्या व वाहनात खालच्या बाजुस चोर कप्पा करुन लपवुन ठेवलेल्या मानवी मेंदूस परिणाम करणारे प्रतिबंधित अफुचे सुकलेले बोंडे (डोडा) व ड्रायव्हर शिटच्या मागील बाजूस एका प्लॉस्टीकच्या पिशवीत अफिम मिळुन आले त्याचे वर्णन खालील प्रमाणे 1) 5,76,000/- रुपये किमतीचे एकूण 72 किलो वजनाचे मानवी मेंदूस परिणाम करणारे प्रतिबंधीत अफुचे सुकलेले बोंडे (डोडा). कि.अं.

2) 7,00,000/- रुपये किमतीचे एकुण 02 किलो वजनाचे मानवी मेंदूस परिणाम करणारे प्रतिबंधीत अफिम कि. अं. 3) 5,00,000/- रु. किमतीचे एक बोलेरो पिकअप वाहन क्र. MP-13, GB-3525 जु.वा.कि.अं

एकुण 17,76,600/- रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कारवाई पेलीस अधीक्षक, धुळे श्री श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे, यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. श्रीराम पवार, पोसई- बाळासाहेब वाघ, असई- रफिक मुल्ला, पोहेकॉ/संदिप ठाकरे, पोहेकॉ/मंगेश मोरे, पोहेकॉ/ चत्तरसिंग खसावद, पोना/  दिनेश सोनवणे, पोकों/ शिवाजी वसावे, पोकों/ कृष्णा पावरा, पोकों/ वाला पुरोहित, पोकों/ दिनकर पवार, पोकॉ/रोहिदास पावरा, पोकॉ/ जयेश मोरे, चापोकॉ/मनोज पाटील यांनी केली असुन सदर वाहन चालक व क्लीनर यांचेव सी.सी.टी.एन.एस. गुरनं. 110/2024 गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 ते कलम 8 (क), 15 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने