शोषित वंचित घटकांसाठी संघर्ष तीव्र करण्याच्या दिवंगत कॉम्रेड एडवोकेट मदन परदेशी यांच्या शोकसभेत निर्धार




शोषित वंचित घटकांसाठी संघर्ष तीव्र करण्याच्या दिवंगत कॉम्रेड एडवोकेट मदन परदेशी यांच्या शोकसभेत निर्धार

शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या संघर्षशील योद्धा म्हणून एडवोकेट मदन परदेशी यांची ओळख होती. त्यांच्या शोकसभे निमित्त आता त्यांच्या सहकाऱ्यांनी शोषित वंचित घटकांसाठी संघर्ष तीव्र करून दिवंगत काँग्रेस ऍडव्होकेट मदन परदेशी यांना श्रद्धांजली देण्याच्या निर्णय घेत शोकसभेत निर्धार व्यक्त केला आहे.

 भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत एडवोकेट मदन परदेशी यांचे दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी हृदयविकाराने धुळे येथील कोर्टात निधन झाले, त्यापूर्वी  12नोव्हेंबर 2023 रोजी आदिवासींमध्ये काम करणारे काँ . डॉक्टर किशोर सूर्यवंशी किसान   सभा जिल्हाध्यक्ष भारतीय, कम्युनिस्ट  पक्ष तालुका सह सेक्रेटरी   यांचे देखील निधन झाल्यामुळे दिनांक 12 /03/2024 रोजी  हिसाळे, तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे   रामदेवजी बाबा मंदिर चौकात जाहीर शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते या  जाहीर सभेस.   मनोगत व्यक्त करण्यासाठी  भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड डॉक्टर भालचंद्र कांगो, महाराष्ट्र राज्य   भाकप सेक्रेटरी कॉम्रेड एडवोकेट सुभाष लांडे, राज्य सहसचिव.कॉम्रेड राजू देसले, महाराष्ट्र राज्य लाल    बावटाशेतमजुर  युनियन  कार्याध्यक्ष प्राध्यापक रामबाहेती, किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष काँ. ऍडव्होकेट हिरालाल परदेशी, धुळे जिल्हा  भाकप सचिव कॉम्रेड वसंत पाटील शिरपूर तालुका भाकप सेक्रेटरी एडवोकेट कॉम्रेड संतोष पाटील  सामाजिक कार्यकर्ते ओंकार आबा जाधव कॉम्रेड अमृत महाजन  ,  उखारामदास पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले शोक सभेचे अध्यक्ष कॉम्रेड अर्जुन कोळी होते,   प्रारंभी दिवंगत कॉम्रेड मदन परदेशी  , डॉक्टर किशोर सूर्यवंशी यांच्यासोबत, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे काँ, रणजीत परदेशी   , कॉ एमजी धीवरे   ,    शिरपूर पंचायत समितीचे माजी सभापती रहिमान पावरा, यांना सार्वजनिक श्रद्धांजली वाहण्यात आली. सुरुवातीला प्रास्ताविक भाषणात हिरालाल परदेशी यांनी मनोगत व्यक्त करताना एडवोकेट मदन परदेशी डॉक्टर किशोर सूर्यवंशी यांनी केलेल्या कार्यावर प्रकाशज्योत टाकला यावेळी परदेशी  म्हणाले की या उदात्त हेतूने आयुष्यभर एडवोकेट मदन परदेशी ,डॉक्टर किशोर सूर्यवंशी    या दिवंगत कॉम्रेड. यांनी गोरगरीब कष्टकरी  यांच्यासाठी आयुष्य वेचले त्यांचा संघर्ष  यापुढे देखील सुरूच ठेवून आगामी काळात गोरगरीब कष्टकरी वर्गाच्या हक्कासाठी लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करून त्यांचे.   अधुरे काम पूर्ण करण्याचा संकल्प केला. यावेळेस  भा कपाचेराष्ट्रीय नेते डॉक्टर भालचंद्र कांगो यांनी एडवोकेट मदन परदेशी व डॉक्टर किशोर सूर्यवंशी यांच्या विचारांचा वसा,व  वारसा धुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी  पुढे नेऊन कम्युनिस्ट पक्षाचे विचार गोरगरीब कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करून डॉक्टर किशोर सूर्यवंशी व ऍडवोकेट मदन परदेशी यांच्या जाण्याने  पोकळी निर्माण झाली  असून चळवळीची फार मोठी हानी झाल्याचे खंत व्यक्त केली.   भाकप,  तालुका सेक्रेटरी एडवोकेट संतोष पाटील यांनी डॉक्टर किशोर सूर्यवंशी  यांनी आयुष्यभर आदिवासींच्या वन जमिनीसाठी लढा उभारून पाया मोर्चा काढून त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अविरत प्रयत्न केले  त्यांच्या जाण्याने आदिवासींचा  विकासाचा चेहरा हरपल्याची खंत व्यक्त केली. त्याचबरोबर एडवोकेट मदन परदेशी म्हणजे चालते बोलते विद्यापीठ असल्याचे सांगून निडर व  निर्भीड व्यक्तिमत्व असलेले  एडवोकेट मदन नाना आयुष्यभर निर्भयपणे जगले कार्यकर्त्यांना देखील निर्भय बनवले  कम्युनिस्ट  विचारसरणीवर परा कोटीची निष्ठा असलेल व्यक्तिमत्व व धुळे जिल्हा  पक्ष व संघटनेचे आधारस्तंभ व मार्गदर्शक हरपल्याने चळवळीवर कार्यकर्त्यांवर आघात झाले असल्याची खंत व्यक्त केली यावेळेस कॉ राजू  देसले, प्राध्यापक रामबाहेती, अमृत महाजन, कॉम्रेड वसंत पाटील, पत्रकार गोपाल मारवाडी, किसान सभेचे उखा पाटील, यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अध्यक्षीय भाषणात   कॉम्रेड अर्जुन कोळी यांनी एडवोकेट मदन परदेशी संघर्षाचे   धगधगती मशाल होती  गोरगरीब कष्टकरी शेतमजूर आदिवासी शेतकरी यांच्यासाठी त्यांनी केलेले कार्य हे विसरता येणार नाही असे सांगून एडवोकेट मदन परदेशी  यांच्या सहवासात असलेले डॉक्टर किशोर सूर्यवंशी यांच्या यांच्या निधनाने चळवळीची मोठी हानी झाली असल्याची खंत व्यक्त करून मग आम्ही काळात संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार आपल्या अध्यक्ष भाषणात व्यक्त केला . एडवोकेट मदन परदेशी यांनी लिहिलेल्या   वन हक्क, हृदयविकार, कोरोना, या विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशन देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निंबा शिंपी यांनी केले यावेळेस उपस्थित मान्यव व कार्यकर्ते यांनी दिवंगत एडवोकेट मदन परदेशी व डॉक्टर किशोर सूर्यवंशी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहिली    शोकसभेत शिरपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय पाटील. तोंदेगावाचे माजी सरपंच लोटन चौधरी , हिसाळे येथील माजी सरपंच बुधा पावरा. उपसरपंच विकास पाटील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळू पाटील , महाराष्ट्र राज्य लालबावटा  शेतमजुर युनियन कार्यकारणी सदस्य कॉम्रेड ईश्वर पाटील , काॕम्रेड. अॕड. सचिन थोरात तरडी येथील उपसरपंच गणेश पाटील , माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाटील , भाकप शहर सेक्रेटरी जितेंद्र देवरे किसान सभा तालुका अध्यक्ष सतीलाल पावरा, शिलदार पावरा गुमान पावरा, भरत सोनार, सुरजमल जैन, कैलास पाटील, कमलाकर पाटील, साहेबराव पाटील,  , कवरलाल कोळी, तुळशीराम पाटील,  नरसिंग  पावरा  , जाड्या पावरा,  दगा जाधव, अमरसिंग पावरा, पक्ष कार्यकर्ते    ,    दिवंगत कॉम्रेड मदन परदेशी.   यांच्या धर्मपत्नी छायाबाई परदेशी. डॉक्टर किशोर सूर्यवंशी यांच्या धर्मपत्नी      अरुणा सूर्यवंशी, व त्यांच्या परिवारातील सदस्य, आशा कार्यकर्ते, महिला ग्रामस्थ,  कम्युनिस्ट पक्ष व जन संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने