विद्यालयात रागोळी स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी दिला जनतेला मतदानाचा संदेश
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात शिरपूर तहसील कार्यालय मार्फत तालुक्यात विविध ठिकाणी मतदार जनजागृती मोहीम राबवली जात असून त्या अंतर्गत तालुक्यातील विद्यालयात रांगोळी स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी जनतेला मतदानाच्या संदेश दिला आहे.
दिनांक १३ -०३ - २०२४ रोजी सावळदे विद्यालयात रागोळी स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी दिला जनतेला मतदानाचा संदेश दिला आहे.
आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालय सावळदे येथे तहसील कार्यालय शिरपूर SVEEP अंतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रम व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिरपूरचे प्रांताधिकारी मा.शरद मंडलिक उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून मा.महेंद्रजी माळी,साहेब तहसीलदार शिरपूर, नोडल अधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी डॉ.नीता सोनवणे, महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती वैशाली निकम, मंडळाधिकारी श्री.व्ही.एम.वाघ, उपसरपंच श्री. सचिन राजपूत, श्री.राजू सोनवणे उपस्थित होते.
या सर्व विद्यार्थ्यांच्या या कलात्मक गुणांचे उपस्थित राहणे कौतुक केले असून यावेळेस विद्यार्थ्यांना व नागरिकांना मतदार जनजागृती याबाबत माहिती देण्यात आली.
