शिरपूर शहरात किराणा दुकानदाराची मुजोरी ग्राहक म्हणून आलेल्या वयोवृद्ध महिलेला मारहाण केल्याने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल




शिरपूर शहरात किराणा दुकानदाराची मुजोरी

ग्राहक म्हणून आलेल्या वयोवृद्ध महिलेला मारहाण केल्याने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरातील महाराजा कॉम्प्लेक्स मधील पीपल बँकेच्या मागे असलेले मनीष ट्रेडर्स या किराणामालाच्या दुकानदाराच्या मुलाने किरकोळ कारणास्तव ग्राहक म्हणून आलेल्या वयोवृद्ध महिलेला स्टीलच्या बाटलीने डोक्यात मारल्याने त्या गंभीर जखमी झाल्या त्यावरून आरोपी यश जैन यांच्या विरोधात फिर्यादी पुष्पावती काशिनाथ वाघ वय 68 राहणार शंकर पांडू नगर शिरपूर जिल्हा धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जैन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या शहरात किराणा मला विक्री करणारे यांची  मुजोरी वाढली आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत असून जर ग्राहकांवर अशी वेळ येत असेल तर अशा प्रवृत्तीच्या लोकांना कडक शासन व्हावे अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की  पुष्पावती काशीनाथ वाघ वय 68 वर्षे व्यवसाय गृहणी रा. प्लॉट नं. 31 शंकर पांडू नगर शिरपुर जि. धुळे यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात नमूद केले आहे की मी परिवारासह वरील ठिकाणी राहत असुन   त्यांचा मुलगा निलेश काशीनाथ वाघ हा स्वस्तिक मोटर्स नावाचे गैरेज चालवून परीवाराचा उदरनिर्वाह भागवितो.

हे परिवार नेहमीच मनीष ट्रेडर्स महाराजा कॉम्प्लेक्स या दुकानावरून किराणा मालाची खरेदी करत असतात.

दि. 12/03/2024 रोजी दुपारी 12.30 वा. सुमारास घरातील किराणा माल घेण्यासाठी तक्रारदार व माझा मुलगा निलेश असे मनिष ट्रेडर्स महाराजा कॉप्लेक्स शिरपुर येथे गेलो. व दुकानातुन किराणा माल घेतल्यानंतर किराणा मालाचे पैसे यश जैन यांना दिले, किराणा मालाची पावती किराणा मध्ये ठेवली गेल्याने यश जैन हा माझा मुलगा निलेश यांचेशी भांडण करुन शिवीगाळ करत होता. तेव्हा मी त्यास सांगितले की, किराणा माल खाली करून पावती देते तु माझ्या मुलाला शिवीगाळ करु नको असे बोलल्याचा यश मनिष जैन याला राग येवुन त्याने बाजुस पडलेली स्टॉलची बॉटलने माझ्या डोक्यावर जोरात मारुन मला दुखापती केले तसेच माझा मुलगा निलेश पास धक्काबुक्की करुन तुझ्याकडून काय उपटेल ते उपटून घे अशी दमदाटी केली मला डोक्यास दुखापत झाल्याने माझा मुलगा निलेश याने मला सिध्दीविनायक हॉस्पिटल शिरपुर येथे दाखल केले असुन माझेवर उपचार सुरु आहे. तरी यश मनिष जैन याने किराणा मालाची पावतीवरुन माझा मुलगा निलेश याला धक्काबुक्की करुन वाईट वाईट शिवीगाळ करुन दमदाटी केली तसेच स्टिलची बाटली माझे डोक्यात जोरात मारुन मला दुखापती केले व मला गंभीर जखमी करण्याच्या प्रयत्न केला म्हणुन माझी तक्रार आहे अशी फिर्याद दिली आहे

या घटनेवरून आरोपी यश जैन यांच्या विरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज पाटील करत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने