नंदुरबार येथे शिवजयंती सप्ताह निमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने भाग्यचिंतन विद्यालय येथे रांगोळी स्पर्धा
नंदुरबार येथे शिवजयंती सप्ताह निमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने भाग्यचिंतन विद्यालय येथे रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. अजित दादा पवार साहेब, प्रांत अध्यक्ष मा.श्री. सुनील तटकरे साहेब, आपत्ती व पुनर्वसन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री. अनिल पाटील साहेब, महिला प्रदेशाध्यक्ष सौ. रुपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वात तसेच नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजीत दादा मोरे यांच्या नेतृत्वात, राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष सौ.सीमाताई सोनगिरे यांनी भाग्यचिंतन माध्यमिक विद्यालय नळबा रोड येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले असता.२६ स्पर्धकांनी यावेळी सहभाग नोंदविला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित गडकिल्ले व शिव प्रतिमा या विषयावरील रांगोळी रेखाटण्यात आली. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष सीमा सोनगरे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा देऊन त्यांना शिवाजी महाराजांचे हे चरित्र आत्मसात करून भविष्यात आपली ही प्रतिमा शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची होईल अशी करावी शिवाजी महाराजांची शिकवण डोळ्यासमोर ठेवून आपण आपली भविष्याची वाटचाल करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी केल्यासारखं होईल असे मार्गदर्शन केले.यावेळी जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, शहराध्यक्ष मोहन माळी, युवती जिल्हाध्यक्ष पल्लवी कुलकर्णी, महिला जिल्हा सरचिटणीस उषा तायडे, जिल्हा उपाध्यक्ष रचना परदेशी, जिल्हा सचिव शकुंतला वळवी, शहर सरचिटणीस दीपिका कलाल, युवती जिल्हा उपाध्यक्ष अविषा पाडवी, तालुकाध्यक्ष उमेश जैन, शहर कार्याध्यक्ष कमलेश चौधरी, यासीन मेमन यांच्यासह जनशिक्षण संस्थेचे कर्मचारी व भाग्यचिंतन विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या व उत्साहात शिवजयंतीच्या रांगोळी स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.
