व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने धुळ्यात आरोग्य शिबिर व आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन




व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने धुळ्यात आरोग्य शिबिर व आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी शिबिराचे करण्यात आले आयोजन

अँकर-: पत्रकारांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची तपासणी त्याचबरोबर पत्रकार बांधवांच्या आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीचे देखील आज धुळ्यात वाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे सर व धुळे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते, यावेळी धुळे शहर अध्यक्ष सोपान देसले यांच्यासह धुळे तालुका अध्यक्ष संदीप त्रिभुवने व व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते, पत्रकार बांधवांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची तपासणी जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली आहे, तसेच आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी देखील पत्रकार बांधवांची व त्यांच्या कुटुंबीयांची संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे,

या शिबिराच्या माध्यमातून पत्रकार बांधवांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेत आपल्या व कुटुंबियांच्या आरोग्याची तपासणी करून घेतली आहे, यावेळी ज्या पत्रकार बांधवांच्या आरोग्य तपासणी दरम्यान आरोग्याच्या बाबतीत समस्या आढळून आल्या आहेत, त्यांना पुढील उपचारा संदर्भात योग्य मार्गदर्शन देखील जिल्हा आरोग्य विभागाच्या डॉक्टरांच्या माध्यमातून करण्यात आले असून, आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी देखील पत्रकार बांधवांची करण्यात आली आहे, यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधवांनी या शिबिराचा लाभ घेतला असल्याचे बघावयास मिळाले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने