शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची मिरवणूक पारंपारिक पद्धतीने उत्साहात संपन्न. प्रतिनिधी दत्ता पारेकर




शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची मिरवणूक पारंपारिक पद्धतीने उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी दत्ता पारेकर 

पुणे:छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंती निमित्त इंदापूरच्या शिवजयंतीचे प्रणेते दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या प्रेरणेने व जयंतीचे आयोजक बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड.राहुल मखरे यांच्या मार्गदर्शनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची मिरवणूक पारंपारिक वाद्यांच्या निनादात उत्साहात पार पडली.
यावेळी माजी राज्यमंत्री, आमदार दत्तात्रय भरणे यांनी भिमाई आश्रमशाळेवर शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन केले. 
इंदापूरच्या माजी नगराध्यक्षा अंकिताताई शहा, मुकुंदशेठ शहा, महारुद्र पाटील, किसनराव जावळे, शकुंतला मखरे,ॲड.राहुल मखरे, ॲड.समीर मखरे यांनी आंबेडकरनगरातील जेतवन बुद्ध विहारात गौतम बुद्ध मूर्तीस, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्धवंदना घेतली. माजी नगराध्यक्ष अंकिताताई शहा, मुकुंदशेठ शहा या दांपत्यानी शिवरायांच्या  पुतळ्याचे पूजन करून महाराजांना मानवंदना दिली.
आंबेडकर नगरातून शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला.घोडे, हलगी, शिंगाडे, ब्रास बँड आदी पारंपारिक वाद्यांच्या निनादात वृद्धांसह, विद्यार्थी व तमाम शिवभक्तांनी ठेका धरत उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणुकीचा आनंद घेतला.
मिरवणूक मेनपेठेतून वाजत गाजत, जुना पुणे - सोलापूर हायवेवरून नगरपालिका मैदानात दाखल झाली.
नगरपालिके समोरील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना व दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष बारामतीचे माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी सुप्रसिद्ध दंगलकार, विद्रोही कवी नितीन चंदनशिवे ( कवठेमहांकाळ,सांगली) यांच्या कवितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वसंतराव साळवे,भारत अहिवळे (बारामती), अंकुश सोनवणे, बाळासाहेब वाघमारे, लालासाहेब कांबळे, मधुकर जगताप, सतीश जगताप(पुणे), गणेश महाजन,अविनाश कोथमिरे, कैलास कदम, यशोधरा रणपिसे,रुपाली रणदिवे, डॉ. श्वेता जगताप, डॉ.अनार्या राहुल मखरे,माऊली नाचण, रवी चव्हाण, ॲड. समीर टिळेकर,ॲड.नारायण ढावरे,ॲड.इनायतअली काझी,ॲड. सुरज मखरे,शाहीर अब्दुलभाई मुलाणी, हमीद आतार, गोरख तिकोटे, अश्वजीत कांबळे, संतोष शेंडे, अक्षय मखरे,पत्रकार राहुल ढवळे, इम्तियाज मुलाणी, सिद्धार्थ मखरे आदी उपस्थित होते.
ॲड. राहुल मखरे यांनी प्रास्ताविक केले.
नानासाहेब सानप यांनी सूत्रसंचालन केले,तर आभार नानासाहेब चव्हाण यांनी मानले.
भिमाई आश्रमशाळेवर  मिष्ठान्नाचे आयोजन केले होते .
शिवजयंतीचे आयोजक ॲड. समीर मखरेंसह व भिमाई परिवाराने जयंतीचे उत्कृष्ट नियोजन केले होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने