रोटरी स्कूलच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या अभिनयातून छत्रपती शिवरायांच्या शौर्याचे व श्रीराम कथेचे सादरीकरण* दोडाईचा (अख्तर शाह )



*रोटरी स्कूलच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या अभिनयातून छत्रपती शिवरायांच्या शौर्याचे व  श्रीराम कथेचे सादरीकरण*

दोडाईचा (अख्तर शाह )

दोंडाईचा येथील श्रीमती बसंतीबाई पाबुदानजी संचेती रोटरी प्री-प्रायमरी इंग्लिश स्कूल व श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये  हॉरीझोन (क्षितिज) व युगांतर 2024 वार्षिक स्नेहसंमेलन रोटरी नागरी  पतसंस्थेचे चेअरमन श्री सुरेश जैन व के. आर. पब्लिक स्कूलचे चेअरमन श्री किशोरभाई वाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत   मालपूर रोड येथील शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी मान्यवर म्हणून संस्थाध्यक्ष श्री हिमांशु शाह, उपाध्यक्ष डॉ.मुकुंद सोहोनी, संचालक हैदरभाई नुराणी,श्री रमेश पारख, पोलीस निरीक्षक श्री निलेश मोरे,श्रीमती शारदाबेन शाह, डॉ.राजेश टोणगांवकर, सौ.हेतल शाह,अनुराधा सोहोनी, श्री नितीन जैन,सौ.राखी जैन, श्री नितीनकुमार संचेती, श्री दिलीप संचेती, सौ.उदयश्री संचेती,प्रिया जैन, आदित्य जैन,मिहिर जैन,चेतन जैन, प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक, इंचार्ज बतुल बोहरी,रोटरी क्लब ऑफ दोंडाईचाचे अध्यक्ष गुलामरसुल शेख, सेक्रेटरी सतिश पाटील उपस्थित होते. 
     दि. 10 व 11 फेब्रुवारी या दोन दिवस चाललेल्या सास्कृतिक कार्यक्रमात 800 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, वादन व नाटिका यात सहभाग घेऊन आपले कलागुण सादर केलेत.प्री-प्रायमरीच्या विदयार्थ्यांनी आजी-आजोबांचे संस्कार, भाऊ-बहिणीचे प्रेम, शिक्षणाचे महत्त्व, आहाराचे महत्त्व, बदलती जीवनशैली, वाहतुकीचे नियम या गोष्टींवर आपल्या अभिनयातून  प्रकाश टाकला. तर प्राथामिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज या थीमममधून शिवजन्म, स्वराज्याची शपथ,स्वराज्याचे तोरण, शत्रूचा केलेला बंदोबस्त, शिवराज्याभिषेक, शिवाजींचे सेनापती व मावळ्यांनी स्वराज्यरक्षणासाठी दिलेले योगदान यांचे नृत्याच्या व नाटिकेच्या माध्यमातून सादरीकरण केले. अयोध्येत 500 वर्षानंतर झालेल्या रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर रामायण थीममधून अयोध्येचा राजपुत्र रामाचा जन्म, राम-सीता विवाह, सीतेचे रावणाकडून अपहरण, रामाकडून रावणाचा वध, त्यात हनुमान व वानरसेनेचे योगदान या प्रसंगाचे सादरीकरण केले.तर युगांतर थीममधून बदलत्या शैक्षणिक गरजेनुसार नवीन शिक्षणप्रणालीत झालेल्या बदलाचे सादरीकरण केले.
      विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांना प्रमुख पाहुणे व उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे दाद देवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. यामुळे स्नेहसंमेलनाचे आगळेवेगळे रुप अनुभवता आले.
    याप्रसंगी  विजय मराठे, रो. नामदेव थोरात, रो. अनिश शाह, रो. सचिन शाह, रो.रविंद्र पाटील,  सौ. वैशाली शाह, डॉ.चेतन बच्छाव, रो.राकेश जयस्वाल, रो. प्रफुल्ल शिंदे, डॉ.अविनाश मोरे, पालक-शिक्षक संघाचे सदस्य व बहुसंख्येने पालक उपस्थित होते.
       प्रास्ताविकात प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक व इंचार्ज बतुल बोहरी यांनी  शाळेच्या भौतिक सुविधा,शैक्षणिक, सहशालेय उपक्रम व क्रीडा स्पर्धेतील प्रगतीविषयी  माहिती दिली.
    यावेळी वर्षभरात शैक्षणिक, शालेय विज्ञान प्रदर्शन, हाउसनिहाय स्पर्धा, क्रीडास्पर्धेतील विभागीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळविलेल्या  विदयार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते, स्मृतिचिन्ह,पदके व प्रमाणपत्र देवून सन्मानीत करण्यात आले.
      सौ.राखी जैन यांनी रोटरी स्कूल या  रोपट्याचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाल्याचे गौरवोद्‌गार काढले.डॉ. मुकुंद सोहोनी यांनी रोटरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची सुशिक्षित व सुसंस्कृत पिढी घडविली जात असल्याचे सांगितले.
  संस्थाध्यक्ष श्री हिमांशु शाह हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सधी देण्यासाठी व आत्मविश्वास वाढवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात असल्याचे म्हणाले.
     प्रमुख पाहुणे श्री किशोरभाई वाणी मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की,जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास हवा. स्वप्ने पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील असावे. मित्र हे औषधीसमान असल्याने चांगल्या मित्रांशी मैत्री करा. पालकांनीही मुलांच्या आवडीनिवडीकडे लक्ष दयावे.मुले ही भविष्याची संपत्ती असून त्यांच्यासाठी पालकांनी वेळ दयावा, मुलांशी दररोज संवाद साधावा.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले 
   जागृती रावल, दिप्ती शिंगाणे, अक्षरा कापुरे, नैतिक सोनवणे, आयुषमान बच्छाव, ओवी बिरारीस, निहारिका कागणे, प्रज्ञा गिरासे,संस्कृती ठाकूर, काव्या चौधरी यांनी ललिता गिरासे व सुवर्णा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सूत्रसंचालन केले.तर आभार इंचार्ज बतुल बोहरी व समन्वयक  प्रशांत जाधव यांनी मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने