पुणे गाडी सुरू करण्याविषयी रेल्वे प्रशासन सकारात्मक* *अशोक मिश्रा* आ.जयकुमार रावल यांची शिंदखेडा रेल्वेस्थानकावर भेट दोडाईचा (मुस्तफा शाह)



*पुणे गाडी सुरू करण्याविषयी रेल्वे प्रशासन सकारात्मक* *अशोक मिश्रा* आ.जयकुमार रावल यांची शिंदखेडा रेल्वेस्थानकावर भेट
दोडाईचा (मुस्तफा शाह)

पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक अशोक मिश्रा यांचा तापी सेक्शनवरील शिंदखेडा व अमळनेर रेल्वे स्थानकाचे कार्यालयीन निरिक्षणासाठी आज मुख्य व्यवस्थापक अशोक मिश्रा पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक निरज वर्मा व इतर सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी आले होते याप्रसंगी आ.जयकुमार रावल यांनी पुणे गाडी सुरू करुन मुंबई सेंट्रल नियमित करण्याविषयी मागणी केली असता मिश्रा यांनी पुणे गाडीची प्रचंड मागणी तापी सेक्शनवर असुन त्याविषयी रेल्वे प्रशासन सकारात्मक असुन तांत्रिक बाबींची पूर्तता लवकरच पुर्ण करुन पुणे गाडी सुरू करण्यात येईल तसेच मुंबई सेंट्रल हि गाडी अजुन काही महिने प्रायोगिक तत्त्वावर चालवली जाऊन कायमस्वरूपी करता येईल 
याप्रसंगी पश्चिम रेल्वे मुंबई सल्लागार समितीचे सदस्य प्रविण महाजन यांनी सांगितले की पुणे येथे जाण्यासाठी संपुर्ण पश्चिम खान्देशच्या प्रवाशांना एकही प्रवाशी गाडी नाही वास्तविक पुणे हे शिक्षणाचे माहेरघर त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रासोबत संगणक क्षेत्रातील अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे कार्यालये हे पुण्यात आहेत यामुळे संपूर्ण धुळे नंदुरबार तसेच जळगांव जिल्हातुन दररोज किमान ५०० खासगी बसेस पुण्यासाठी धावतात त्यामुळे प्रवाशांना वेळ ,पैसा व श्रम अधिकचे पडतात तरी पश्चिम खान्देशसाठी( तापी सेक्शन) पुणेसाठी लवकरच प्रवाशी गाडी सुरु करावी पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी भुसावळ -मुंबई सेंट्रल (०९०५१/५२)नविन प्रवाशी रेल्वे आपल्या ट्रेन आँन डिमांड अशा प्रायोगिक तत्त्वावर सुरु होऊन सदर प्रवाशी गाडीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे प्रवांशांची मोठी सोय निर्माण होऊन रेल्वे प्रशासनाला अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न मिळत आहे सदर गाडी प्रायोगिक तत्त्वावर २८ फेब्रुवारी पावेतो असुन सदर गाडीचे रुपांतर खान्देश एक्स्प्रेसमध्ये करुन कायमस्वरूपी करावी तसेच भुसावळहुन सदर एक्स्प्रेस  २ तास उशिराने व बांद्रा किंवा मुंबई सेंट्रलहुन २ तास आधी सोडण्यात यावी जेणेकरून प्रवाशांची सोय होईल 
तापी सेक्शन वरील दिवसा धावणारी विकासवाहिनी सध्या सुरत- नंदुरबार व नंदुरबार-भुसावळ(०९०७७/७८) अशा दोन टप्प्यांत धावते तरी सुरत येथे प्रवास करणारे जेष्ठ नागरीकांसह आबालवृद्ध महिला प्रवाशांना दोन टप्प्यांत प्रवास करावा लागतो तरी सदर पँसेन्जर सलग सुरत-भुसावळ थेट करण्यात यावी.
 १९००६ ,१९००८,१९१०६  भुसावळ- सुरत ह्या  पँसेन्जर व मेमु गाडी मध्यरात्री मागोमाग धावतात त्याऐवजी ह्यापैकी २ गाड्या पहाटेपासून योग्य अंतराने सोडण्यात याव्यात जेणेकरून प्रवाशांची सोय होऊन रेल्वेला उत्पन्न मिळेल.दोंडाईचा रेल्वे स्थानकांवर चैन्नई -जोधपुर (२२६६३/६४), रामेश्वरम-ओखा  एक्स्प्रेस (१६७३३/३४) ओखा-पुरी (२०८१९/२०)इ जलद गाड्यांना थांबा द्यावा तसेच अमरावती -सुरत(२०९२५/२६) हि गाडी दररोज करावी हि विनंती.दोंडाईचा गेट क्रमांक १०३ वर आर यु बी ( बोगदा) त्वरीत करण्यात यावा तसेच  १०२ वर आर ओ बी ( उड्डाणपूल) झाल्यामुळे परिसरातील रामी- पथारे या ग्रामीण भागात जाण्यासाठी आर यु बी ( बोगदा) करण्यात यावा दोंडाईचा शिंदखेडा व नरडाणा रेल्वे स्थानकांवर अपंग व जेष्ठ नागरीकांच्यासाठी सरकता जिना ,स्टेशनच्या दुसऱ्या बाजुस जाण्यासाठी स्टेशनखालुन रस्ता (आर यु बी ) दोन्ही प्लँटफार्मच्या दोन्ही बाजुस प्रसाधनगृह तसेच कव्हर शेड व वातानुकूलित सुसज्ज प्रतिक्षा गृह इ सुविधा करण्यात याव्यात अशी मागणी आ जयकुमार रावल यांच्या माध्यमातून प्रविण महाजन यांनी केली याप्रसंगी शिंदखेडा प्रवाशी संघटनेचे दादा मराठे माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील माजी नगरसेवक प्रविण माळी प्रकाश चौधरी जायन्टस दोंडाईचाचे चंद्रकांत जाधव सुनिल शिंदे डॉ मनिष गिरासे चंद्रकला सिसोदिया महेंद्र महाजन इ मान्यवर उपस्थित होते .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने