हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापार्यावर कारवाई करा- शेतकऱ्याचे निवेदन
शहादा -हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करणा-या राधिका कॉटन दोंडाईचा रोड, शहादा यांच्यावर कारवाई होऊन गुन्हा दाखल करा अशी मागणी प्रीत शेतकरी सुमित गिरासे यांनी सहाय्यक निबंध अधिकारी शहादा त्यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
त्यात असे नमूद केले आहे की शहादा कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत खाजगी व्यापाऱ्यांमार्फत कापूस खरेदी सुरू आहे. त्या अनुषंगाने मी स्वतः दिनांक ०५ फेब्रुवारी २०२४ रोजी ०४ क्विंटल कापूस बाजार समितीने नेमलेल्या राधिका कॉटन येथे विक्री केला.
मात्र राधिका कॉटन यांनी माझा ए ग्रेड कापसाला शासनाच्या रुपये ७०२० हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी केला याबाबत मी हमीभावापेक्षा कमी दराने कापूस का खरेदी करत आहात असे विचारले असता, अरे राविने उडवडीचे उत्तरे दिली.
तसेच पक्के बिल मागितले असता पाच ते सहा दिवस उशिराने बिल दिले. त्यामुळे ए ग्रेड कापूस असतानाही हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या राधिका कॉटन् यांच्या विरोधात कठोर कारवाई होऊन शेतकऱ्याची आर्थिक लूट करणाऱ्या या व्यापाऱ्यावर शासनाच्या निदर्शनानुसार तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत. शिवाय ५ व ६ फेब्रुवारी २०२४ रोजी सदर व्यापाऱ्यांनी किती शेतकऱ्यांकडून कमी भावाने कापूस खरेदी केला त्या हमीभावाच्या तफावत किती आणि बिलाचे निपक्षः पणे चौकशी व्हावी अशी मागणी कमी केली आहे. या निवेदनाची प्रत त्यांनी विविध शासकीय अधिकाऱ्यांना देखील दिली असून त्वरित चौकशी होऊन शेतकऱ्यांची लूट थांबवावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
