स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रयत्नांनी शेतकरी व पपई व्यापारी यांच्यात समन्वय
प्रतिनिधी शहादा सुमित गिरासे
स्वाभिमानी शेतकरी संघटना विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी यांच्या मध्यस्थीने शेतकरी व पपई व्यापारी यांच्यात बैठक होऊन पपई उत्पादक शेतकऱ्यांना आठ रुपये 60 पैसे प्रमाणे भाव मिळावा असे ठरले
याबाबत सविस्तर वृत्त असे की शेतकरी व पपई व्यापारी या दोघांमध्ये पपईच्या भावावरुन एकमत होत नव्हते .सुरुवातीला पपई व्यापारी शेतकऱ्यास सात रुपये अकरा पैसे याप्रमाणे व्यापारी भाव देत होते. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकारी शेतकरी व व्यापारी यांची बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात घेण्यात आली. बैठकीत शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांना व्यापाऱ्याकडून भाव वाढवून मिळावा अशी मागणी होत होती तर व्यापारी आठ रुपये पन्नास पैसे यापेक्षा जास्त भाव वाढवून देणार नाही अशा चर्चा होत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकारी यांनी मध्यस्थी करून पपईचा भाव हा आठ रुपये साठ पैसे सर्वानुमते ठरला. शेतकरी व व्यापारी यांच्यात एकमत झाले. चर्चेत शेतकऱ्याने पपई व्यापाऱ्यास माल देण्याचे ठरविले तर त्यात बदल करू नये व व्यापाऱ्याने देखील पपई तोड थांबवू नये अशी समन्वयाची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष यांनी स्वतंत्र भारत प्रतिनिधी शी बोलताना दिली. मधला मार्ग निघाल्यामुळे 9 फेब्रुवारीपासून उत्पादक शेतकऱ्यांनी कटिंग करण्यास परवानगी दिली.
बैठकीस शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी नंदुरबार जिल्हाध्यक्ष नथू पाटील युवा जिल्हाध्यक्ष सचिन पाटील व्यापारी हाजी सरताज , फारुख भाई, नाझीम भाई, शंकर राजस्थानी सह परिसरातील व्यापारी तर शेतकरी प्रतिनिधी म्हणून लड्डू भाई पाटील धुरखेडा चंद्रकांत पाटील समशेरपुर निजर बेळगा त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.
