तापी पुलावरून उडी घेत महिलेच्या आत्महत्येच्या प्रयत्न
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुमित गिरासे
सारंगखेडा तापी पुलावरून वडाळी येथील आशाबाई काळू पवार यांनी सायंकाळी पावणे सात वाजता तापी नदी पुलावरून उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पूलावर प्रचंड बघ्यांची गर्दी जमा झाली. जवळपास जवळपास दहा मिनिटे आशाबाई पवार ह्या साडी मुळे हवेचा फुगा तयार झाला यामुळे त्या दहा मिनिटे तरंगत होत्या तेवढ्यात सारंगखेडा येथील हिलाल सुकलाल ठाकरे पैलवान व त्यांचे चिरंजीव रतिलाल हिलाल ठाकरे आप्पा मोरे त्याचबरोबर टेंभा तसा येथील राकेश मोहनसिंग गिरासे या देवदूतांनी तापी पात्रात उडी घेत आशाबाई पवार यांच्यापर्यंत पोहोचत त्यांनी त्या महिलेचे प्राण वाचवले. टाकरखेडा येथील मासेमारी करणाऱ्या एका देवदूताने तिथपर्यंत थर्माकोल ची होळी तिच्यापर्यंत पोहोचवली त्याचा आसरा घेतला व या सर्वांनी तिला काठावर आणले त्याचबरोबर पुलावरून जात असलेले वाहन आईसर क्रमांक एम एच १८ बीएच ७१०८ यावरील चालक मैताब शहा शहाजहान राहणार दोंडाईचा तालुका शिंदखेडा यांनी आपल्या गाडीवरील भला मोठा दोर तापी पुलावरील ग्रामस्थांनी डोर महिलेपर्यंत पोचवला महिलेने तो दोर घट्ट धरला तोपर्यंत हे चारही देवदूत महिलेजवळ पोहोचले व महिलेचे प्राण वाचवून त्यांनी मोठे पुण्याचे काम केले ग्रामस्थांनी चारही जणांचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी सारंगखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल ठाणसिंग राजपूत, राजू वळवी, असई अकील पठाण, पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील आदी उपस्थित होते महिलेची प्रकृती उत्तम असून ती सारंगखेडा येथील दिलीप शिंदे यांची भगिनी होती
