आमदार कार्यालय शहादा येथे भारतीय जनता पक्षाच्या बेटी बचाव बेटी पढाव तर्फे पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटप




प्रतिनिधी शहादा , सुमित गिरासे

      आमदार कार्यालय शहादा येथे भारतीय जनता पक्षाच्या बेटी बचाव बेटी पढाव तर्फे पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटप

         प्रदेश महामंत्री विजय भाऊ चौधरी प्रदेश अध्यक्ष शुभा फरांदे उपाध्यक्ष अल्फा अग्रवाल यांच्या आदेशानुसार माननीय आमदार राजेश दादा पाडवी जिल्हा अध्यक्ष निलेश भाऊ माळी उपाध्यक्ष माननीय मकरंद पाटील साहेब विधानसभा प्रभारी कैलास भाऊ चौधरी जिल्हा संयोजक निलाबेन मेहता यांच्या मान्यतेने नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले
        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेविका सौ माधवीताई पाटील होत्या प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष अल्फा अग्रवाल जिल्हा संयोजिका निलाबेन मेहता होत्या
        बेटी बचाव बेटी पढाव जिल्हा पदाधिकारी म्हणून घनश्याम पाठक रोहिणी भावसार संगीता पाठक वंदना भावसार मिताली पाटील यांची नियुक्ती करण्यात आली तालुका अध्यक्ष म्हणून सौ किरण शरद पाटील व तालुका कार्यकारणीत ज्योती पाथरवट रूपाली चौधरी राजश्री पाटील सुनिता वाणी पूजन कोर गिरासे व शहर कार्यकारणीत पायल डांबरे संगीता वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली
      याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन जिल्हा सरचिटणीस घनश्याम पाठक जिल्हा सचिव कमलेश जांगिड महिला शहराध्यक्ष नंदाताई सोनवणे महिला मोर्चाच्या ज्योती पाटील पूजा पाटील मनीषा पाटील उपस्थित होते
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्याम पाठक यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी हेमराज पवार मयूर बाविस्कर यांनी परिश्रम घेतले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने