शिरपूर महसूल विभागाकडून मोबाईल कंपनीच्या टॉवरवर कारवाई
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात महसूल विभागाकडून मोबाईल कंपनीच्या टावर वर सेत सारा वसुलीसाठी कारवाई करण्यात आली असून टॉवर सील करण्याची प्रक्रिया महसूल विभागाकडून करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मौजे अर्थे तालुका शिरपूर येथे आयडिया व इंडस कंपनीचे मोबाइल टॉवर बाबत बिनशेती सारा शासकीय वसूली थकबाकी असल्याने सदरचे टॉवर सिल करण्यात आले आहेत .त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये सक्तीची वसुली कार्यवाही सुरू करण्यात आली आहे .
सदर करवाई तहसीलदार शिरपुर यांचे आदेशाने निवासी नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी अर्थे व तलाठी अर्थे यानी केली आहे. सदर कंपन्यांनी शासनाच्या महसूल थकवल्याने प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
