*गावाचे रक्षण करणारे पोलीस पाटील सह ग्रामपंचायत सदस्यांना गावगुंड्याकडून मारहाण शिंदखेडा पोलीस निरीक्षक दबावाखाली फिर्याद घेत नाही एसपी कडे तक्रार...*
दोंडाईचा प्रतिनिधी:
शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे प्र.न. येथे ग्रामपंचायतीचे लोकविधायक विकास कार्य असतांना दि.२५ जानेवारी रोजी गावाचे सरपंच रजेसींग गिरासे व काही ग्रामपंचायत सदस्य व त्यांचे सहकारी काम पाहणीसाठी गेले असता गावातील गावगुंडे अजित साहेबराव पाटील व किरण रवींद्र पाटील सह त्यांचे साथीदार यांनी सरपंच व काही सदस्य सोबत महिला सदस्य सह त्यांचे प्रतिनिधींना विकास काम थांबविण्यासाठी लज्जास्पद शिवीगाळ केली.
म्हणून वाद मिटविण्यासाठी सरपंच यांनी गावाचे पोलीस पाटील अनंत भाईदास देशमुख यांना बोलविण्यास पाठविले व काही मिनिटात पोलीस पाटील कामाच्या ठिकाणी हजर झाले याची कल्पना या आधी आरोपींना होती त्यामुळे कट रचून बसलेले वरील दोघे आरोपी अजित देसले व किरण पाटील यांनी अचानक कुठलेही चर्चा न करता पोलीस पाटील व ग्राम पंचायत सदस्य महेंद्र माळी यांना मारहाण सुरू केली सरपंच व काही महिला सदस्य आरोपींना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करू लागले म्हणून त्यांच्यावर ही हात उचलत लज्जास्पद शिव्या दिल्या व काही गावातील लोक त्यांना वाचविण्यासाठी पुढे आले त्यांनाही वरील आरोपींनी मारहाण केली कसतरी लोकांच्या मदतीने पोलीस पाटील व ग्रामपंचायत सदस्य महेंद्र माळी यांनी त्यांच्या तावडीतून स्वतःची कशीतरी सुटका केली व घटनास्थळापासून जीव वाचवून पळाले यात दोघींना जबर मारहाण केली म्हणून त्यांना दुखापत झाली त्यासाठी सरपंच व काही गावातील लोकांच्या मदतीने शिंदखेडा सरकारी रुग्णालय येथे प्राथमिक उपचारासाठी आणले त्या नंतर शिंदखेडा पोलिसांना ही माहिती कळविण्यात आली त्यांनी मेमो दिला व महेंद्र माळी याला पोटात व जास्त छातीत दुखू लागले व श्वास घेण्यास त्रास होऊ लागला म्हणून डॉक्टरांनी धुळे येथे मोठ्या रुग्णालयात हलविण्यासाठी सांगितले व तशी स्थलांतर चिठ्ठी लिहून दिली व आज पर्यंत पुढील उपचार सुरू आहेत.
झालेल्या प्रकारची तक्रार करण्यासाठी त्याच दिवशी संध्याकाळी पोलीस पाटील यांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना सोबत घेवून झालेला प्रकार शिंदखेडा पोलीस निरीक्षक यांना सांगितला आरोपींनी सरकारी कामात अडथळा व सरकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्यावर जीवघेणा हल्ला व लज्जास्पद शिवीगाळ केल्याप्रकरणी भां.द.वी. कलमानुसार कायदेशीर गुन्हा नोंविण्याची रास्त व योग्य मागणी फिर्यादिने पोलीस पाटील ने केली त्यानंतर आरोपींना काही तासा नंतर पोलिसांकडून बोलवण्यात आले परंतु गुन्हा न नोंदविता त्यांना पोलीस निरक्षकांकडून प्रेमात समज देवून परत पाठविले त्यामुळे त्या आरोपींना माज आला आणि गावात आल्यानंतर त्यांनी पोलीस पाटिलांच्या घरासमोर येवून पुन्हा घाण घाण शिव्या दिल्या व तु आमच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार जरी दिली तरी आमचे काही वाकडे होणार नाही आमचा वशिला मोठा आहे आम्हाला काही फरक पडत नाही अशा धमक्या देवू लागले, असे फिर्याद मध्ये म्हटले आहे या वरून अस वाटते की असे गाव गुंढ्यांचे राज्य सुरू आहे का? पोलीस निरीक्षक यांनी गुन्हा का नोंदविला नाही? जो गावाचे रक्षण करून पोलीस यंत्रणेला मदत करत गावाची कायदा व सुव्यवस्था व शांतता राखतो अशाच आपल्या सहकारी कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला होत असेल तर इतर सर्व सामान्य लोकांचे काय? शिंदखेडा पोलीस स्टेशन मध्ये या आधी वरील आरोपींवर अनेक वेळेस मारहाणीचे व शिवीगाळ तसेच चोरीच्या तक्रारी व गुन्हे नोंद करण्यात आली आहे मग एवढे अट्टल आरोपींवर निरीक्षक का गुन्हा नोंदवित नाही यातून असा निकष लावला जातो की अशा लोकांना कोणी तरी संरक्षण देत आहे म्हणून यांच्यावर कडक कारवाई निरक्षकाकडून केली जात नाही.
त्याकरिता गावातील पोलीस पाटील अनंत देशमुख व सरपंच यांनी वेग वेगळ्या तक्रार धुळे एसपी यांच्याकडे सदर घटनेची स्वतः जाऊन लेखी तक्रार अर्ज द्वारे दिली व सर्व झालेला जीवघेणा प्रसंग सांगितला आता पुढे प्रतिबंधात्मक कडक कारवाई होते का नाही याची प्रतीक्षा गावातील व तालुक्यातील नागरिकांना आहे.
शिंदखेडा तालुक्यात अशा गाव गुंडा वृत्तीवर पोलिस निरक्षक दीपक पाटील यांनी साथ न देता विशेष कारवाई करण्यासाठी पुढे येणे गरजेचे होते व पुन्हा अशा गंभीर प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घेणे महत्वाचे होते परंतु या मागचे राजकीय गूळ काय ? तालुक्यातील जनतेचा विश्वास अशा निष्कामी अधिकारी वर बसेल का ? या मध्ये वरिष्ठ अधिकारी यांनी सदर प्रकरणाची दाखल घ्यावी व जनतेचा अपेक्षांचा आदर करावा हेच योग्य राहील ....
