रोटरी स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ** दोडाईचा मुस्तफा शाह




रोटरी स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ**
दोडाईचा मुस्तफा शाह

दोंडाईचा येथील श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलमध्ये इ. 10 वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष श्री हिमांशु शाह होते.यावेळी प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक व शिक्षक उपस्थित होते. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेच्या वतीने इ. 10 वीच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या  हस्ते भेटवस्तू देऊन  गौरविण्यात आले. तसेच नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना व दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू  देवून सत्कार केला.
यावेळी कविता, नाटक, नृत्य यांच्या सादरीकरणाबरोबर खेळांचेही आयोजन करण्यात आले  होते.
आश्लेषा कागणे, सिध्दी गिरासे, वसुंधरा पाटील, अदित्य इंदानी या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शाळेने आमच्यात शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त नेतृत्व,आत्मविश्वास या गुणांची रुजवणूक केली. शिक्षकांनी  केवळ विषय शिकवला नाही,तर जीवनाचे तत्वज्ञान शिकवले. आमच्या व्यक्तिमत्व विकासात सर्व शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. अशा शब्दांत हृदयस्पर्शी भाषण केले.
श्री संदिप सोनवणे यांनी आपल्या भाषणातून विदयार्थ्यांनी संपादन केलेली गुणवत्ता हीच खरी शिक्षकांच्या  अध्यापनाची पावती असून स्वयंअध्ययन व परिश्रमाने  यशस्वी जीवनाचा मार्ग अवलंबण्याचे सांगितले.
प्राचार्य श्री श्रुतिरंजन बारिक यांनी तुमच्यात असणाऱ्या क्षमतांना विकसित करा. दहावीनंतर वेगवेगळ्या संधी उपलब्ध असतील त्या संधीचे सुवर्णसंधीत रूपांतर करून व्यक्तिमत्व घडवावे.असे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात श्री हिमांशु शाह म्हणाले की, आई, वडील व शिक्षकांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन जीवनाचा मार्ग सुकर करावा. ज्ञानरुपी शिदोरी घेऊन स्पर्धेच्या युगात यशस्वी व्हा. येत्या 20 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या सीबीएसई बोर्ड परीक्षा डोळ्यासमोर ठेवून अभ्यासाचे नियोजन करावे.  अभ्यास व लेखनतंत्र यांची योग्य सांगड घालून प्रश्नपत्रिका सोडवावी. प्रश्नांची भाषा नीट समजून उत्तरे लिहावेत.      
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुवर्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नववीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. प्रथमेश सोनजे,जागृती रावल अक्षरा कापुरे,श्रद्धा ठाकरे आकांक्षा राजपूत यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार जनक अहिरराव याने मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने