*थाळनेरला सेवानिवृत्त बीएसएफ जवानाचा झोल गेल्यामुळे गॅलरीतून पडून मृत्यू*
थाळनेर(वार्ताहर):-
शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील सेवानिवृत्त BSF जवानाचा घराच्या दुसऱ्या मजल्याच्या गॅलरीतून रात्रीच्या सुमारास अचानक झोल जाऊन पडल्यामुळे मयत झाला.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १/२/२४ रोजी मधुकर विठ्ठल खैरनार यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मयत सेवा निवृत्त BSF जवान विनोद बिसन शिरसाठ(५०) रा.थाळनेर रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घराच्या दुसऱ्या मजल्या वरील गॅलरीतून झोल जाऊन जमिनीवर पडले.त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यासह इतर भागावर जोरदार मार बसला व ते बेशुद्ध झाले.त्यांना थाळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर तात्काळ शिरपूर कॉटेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. कॉटेज हॉस्पिटलचे डॉ.रवींद्र पावरा यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात थाळनेरला दुपारी३.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे.
त्यांनी BSF मध्ये 25 वर्ष सेवा बजावल्या नंतर सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर तीन वर्षे शिरपूर येथील एका बँकेत गनमन म्हणून नोकरी केली होती. सध्या ते गावात शेती करत होते. त्यांचा एक मुलगा जळगाव येथे नोकरीस असून दुसरा मुलगा पुणे येथे बीएससी ऍग्री चे शिक्षण घेत आहे.त्यांचा पाच्यात आई,पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे. याबाबत थाळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
