लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या निवडणुकीचा निकाल
शहादा--
लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे नेते दीपकबापू पाटील यांच्या लोकशाही पॅनलने बाजी मारत सूतगिरणीवर पुनश्च सत्ता स्थापन केली आहे. तर अभिजीत पाटील यांचे शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत निवडणूकीचा निकाल बाहेर येताच लोकशाही पॅनलच्या कार्यकर्त्यांनी खरेदी-विक्री संघाचे आवारात व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करीत मोठा जल्लोष केला दीपकबापू पाटील व प्राध्यापक मकरंद पाटील यांनीही सहभाग घेतला
येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सूतगिरणीच्या 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे नेते दीपकबापू पाटील यांचे लोकशाही पॅनल व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांचे शेतकरी विकास पॅनल यांच्यात सरळ लढत झाली. या लढतीत लोकशाही पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी बाजी मारत सूतगिरणीवर एकहाती सत्ता स्थापन केली आहे.
येथील लोकमान्य टिळक टाऊन हाॅल येथे आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला निवडणुकीचा निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष दिसून आला. सुरुवातीपासूनच लोकशाही पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी आघाडी घेतली होती ही आघाडी कायम राखत या पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहे. निकाल जाहीर होताच शहरातील खरेदी विक्री संघाजवळ लोकशाही पॅनल तर्फे जल्लोष साजरा करण्यात आला.. या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख अभिजीत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वस्त्रोद्योग उपायुक्त दीपक खांडेकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पात्रे यांनी कामकाज पाहिले.
*लोकशाही पॅनल -विजयी उमेदवारांना मिळालेली मते*
* पाटील दीपक पुरूषोत्तम-( विजय-४७ ),
पाटील हरिदास सदाशिव-( ३१२९ ),
पाटील वासुदेव सखाराम-(३२४८ )
पाटील वैकुंठ ईश्वर-(३१८४ ),
पाटील राजेंद्र लक्ष्मण-( ३२६७)
पाटील विलास उत्तम-( ३२३३),
पटेल लतिश ब्रिजलाल-(३१७० ),
पाटील मुरलीधर भूता-(३२२१ ),
चौधरी रमाकांत मगन-(३१९४ )
पाटील गणेश मणिलाल-(३१९० )
चौधरी अरविंद सुंदर-( ३२५८ )
पाटील गणेश मगन-( ३१७३)
चौधरी भगवान नरोत्तम-( ३२९०)
पाटील भगवान मोहन-(३२६८ )
पाटील शितलकुमार हितांशु (३२४१ )
चौधरी सुरेश सोमजी-( ३२०५)
पाटील मकरंद नगिन-( ३४०७)
पवार योगेश दरबारसिंग-(३५७० )
धनगर दिलीप चैत्राम-( ३६१५)
पटेल कल्पना काशिनाथ-(३५७९ )
पाटील शितलबेन विजय-(३३५७ )
