इंदापूरात अजितदादा पवार ,सुनित्राताई पवार आणि लोकप्रिय आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा जंगी मेळावा पडला पार प्रतिनिधी दत्ता पारेकर



इंदापूरात अजितदादा पवार ,सुनित्राताई पवार आणि लोकप्रिय आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा जंगी मेळावा पडला पार

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचा फार मोठा कार्यकर्ता मेळावा पडला . या कार्यकर्ता मेळाव्यासाठी  इंदापूर तालुक्यात प्रथमच राजकीय व्यासपीठावर सुनेत्राताई पवार, जय पवार, यांची उपस्थिती पाहीला मिळाली. 

 जय पवार ,श्रीराज भरणे आणि अनिकेत भरणे हे हजारोंच्या युवकासह सभास्थळी दाखल झाले होते . इंदापूरच्या या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार कार्यकर्त्यांनी पुढील दोन महिने संयम ठेवा मित्र पक्षावर टीका टिप्पणी टाळा असे सूचना दिले आहेत.



 आमदार दत्तात्रय भरणे यांनी अजित दादा आपल्या इंदापूर तालुक्यासाठी कामाचा माणूस असल्याचे सांगितले. अजित दादांमुळे तालुक्याचा फार मोठा विकास झाला आहे. असेही आवर्जून सांगितले. 

आमदार भरणे यांनी शिरसोडी ते कुगाव हा नदीवरील पूल बांधण्यात यावा याची मागणी करताच अजितदादांनी ही मागणी मान्य केली व लवकरच ही पुलाचे काम सुरू करू अशी ग्वाही दिली. याच पुलासाठी कुगावच्या तत्कालीन सरपंच तेजस्वी दयानंद कोकरे यांनीही ही मागणी केली होती.

 या पुलामुळे इंदापूर तालुक्यासह मराठवाड्याच्या विकासाला चालना देणारा व  पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा सर्वात जवळचा उजनी बॅकवाॅटर परिसरातून जाणारा कुगाव ता करमाळा ते शिरसोडी ता इंदापूर पाण्यातील पुल विकसीत झाल्यास ...

 प्रस्तावीत कुगाव ते शिरसोडी पुलाचे फायदे पुढीलप्रमाणे सांगता येतील...
१) मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील अंतर १०० किलोमीटर कमी होणार
२) मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग तयार होणार
३) हनुमान भक्तांची मागणी असणारा मार्ग पूर्ण होऊन हनुमान भक्तांची गैरसोय दूर होणार.
४) इंदापूर शहराची उलाढाल पाच पट वाढणार
५) रूई येथील बाबीर देवस्थान ला भेट देणाऱ्या बाबीर भक्तांची गैरसोय दूर होणार
६) तरकारी मालाला बाजारपेठ उपलब्ध होणार
७) उसासाठी पर्यायी कारखाने उपलब्ध होणार
८) केळी निर्यातस बंदरावर जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग उपलब्ध होणार (सध्या देशात सर्वाधिक केळीची निर्यात उजनी बॅकवाॅटर परिसरातून होते)
९) रोजगार निर्मितीच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढणार
१०) उजनी बॅकवाॅटर टुरिझम ट्रॅन्गल परिसरातील पर्यटनाचा विकास होणार (भिगवण-टेंभूर्णी-करमाळा-भिगवण)
११) दर्जेदार शिक्षणाची सोय होईल
१२) आरोग्याची सोयी सुविधा उपलब्ध होणार
१३) चित्रपटाचे चित्रीकरण होणार
१५) उजनी बॅकवाॅटर परिसरातील बोटींग व्यवसायाला प्रचंड चालना मिळणार
१६) उजनी धरणात साधारण ६०,००० कोटी+ ची वाळू आहे त्यासाठी पर्यायी रस्ता तयार होणार
१७) बलुतेदार व अलुतेदार यांच्या व्यवसायाला प्रचंड चालना मिळणार
१८) मराठवाड्यातील व्हाॅटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढेल
१९) रोटी बेटी चे संबंध वाढणार
२०) मासेमारी बांधवांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार
२१) आपल्या परिसरातील जमीनीच्या किंमती प्रचंड वाढणार
२२) वाहतुकीची सोय उपलब्ध झाल्याने आपल्या परिसरात मोठ मोठे उद्योग धंदे वाढण्यास मदत मिळणार
२३) आपल्या परिसरात मुबलक पाणी साठा असल्याने आपल्या भागात मोठ्या प्रमाणात घरे वाढणार
२४) शहरी भाग व ग्रामीण भाग अंतर कमी होण्यास मदत होणार
२५) फोटोग्राफी व्यवसायाला पर्यटकांमुळे चांगल्या पद्धतीने व्यवसाय वाढवण्याची संधी उपलब्ध होणार
२६) व्यवसाय वाढल्याने जाहिरात क्षेत्रात काम करणार्या लोकांना चांगल्या संधी उपलब्ध होणार
२७) स्थानिक परिसरातील बेरोजगार युवकांना गावातच रोजगार निर्माण होणार
२८) पश्चिम महाराष्ट्राला जोडल्याने मराठवाड्याच्या विकासाचा वेग प्रचंड वाढणार

कुगाव ता करमाळा जि सोलापूर हे ठिकाण भीमा नदीच्या काठी असून कुगाव ला भीमा नदीच्या पात्राने तिनही बाजूला वेढले आहे. कुगाव गावच्या नदी पात्रासमोर सात गावांचे क्षेत्र असून यात  सोगाव, वाशिंबे, गंगावळण, कळाशी, कालठण, शिरसोडी, पडस्थळ या गावांचा समावेश होतो. जाण्यासाठी चार जलमार्ग व एक भुमार्ग मंजूर आहे.  भुमार्गाने जाण्यासाठी १४० किलोमीटर चा नाहक वळसा मारावा लागतो तर जल मार्गाने जाण्यासाठी शासनाने चार मार्ग मंजूर केले आहेत पण शासकीय बोटी किंवा जलथांबे अशा कोणत्याही प्रकारचा सोयी सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या नाहीत . कुगाव येथे हनुमानाचा जन्म झाला आहे असे तेथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे हनुमान भक्तांना व परिसरातील स्थानिक नागरिकांना जीव मुठीत घेऊन खाजगी नौकांचीच मदत घ्यावी लागते. त्यापैकी सर्वात जवळचा मार्ग कुगाव ते शिरसोडी पूल मंजूर केल्याने या परिसरातील अर्थकारणाला चालना मिळणार आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने