जैन सोशल ग्रुप दोंडाईचा तरफे हृदय रोग निदान शिबीर सम्पन्न* दोडाईचा( मुस्तफा शाह)



*जैन सोशल ग्रुप  दोंडाईचा तरफे हृदय रोग निदान शिबीर सम्पन्न*
दोडाईचा( मुस्तफा शाह)

दोंडाईचा दि.24 रोजी जैन सोशल ग्रुपच्या वतीने स्व. शांताबाई कवाड व पारख हॉस्पिटल यांच्या सौजन्याने भव्य हृदयरोग विकार निदान शिबिर घेण्यात आले.या शिबिरात नाशिक येथील नाईन पल्स हॉस्पिटलचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.शितल कुमार हिरण यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर शिबिराचा समारोप तपासनी सह करण्यात आला. सदर हृदयरोग विकार निदान शिबिरात दोंडाईचा शहरातील सकल जैन समाजाचे 100 पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी अल्पदरात करण्यात आली आहे.या शिबिरात रक्त तपासन्या, ई सी जी,2 डी ईको,स्ट्रेस टेस्ट इ.करण्यात आल्या.
यावेळी   शिबिरात हृदयरोग तज्ञ डॉ. शितल कुमार हिरण यांनी हृदयविकार संबंधी मार्गदर्शन करताना आपल्या मनोगतात व्यक्त  केले , भारतात मधुमेह व  हृदयविकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वयाच्या 30 व्या वर्षात हृदयाची तपासनी केली पाहिजे असे इंडियन मेडिकल असोसिएशन ने निर्देश दिले आहेत. दुर्लक्ष केल्यामुळे हृदय विकाराचा त्रास वाढतो .घर सजावटीसाठी लोकांजवळ वेळ आहे पण हृदयची काळजी घेण्यासाठी वेळ नाही .लोकांच्या निष्काळजीपणामुळे जीव गमावावा लागतो. आपल्या जीवनात चतुर्थी सूत्राचा वापर करावा, यात  योग्य आहार,  योग्य विचार ,योग्य संचार आणि योग्य उपचार आहे .आहारात तेलाचे प्रमाण कमी करून तनावरहित जीवन पद्धतीचा अवलंब करावा. रोज व्यायाम कमीत कमी अर्धा तासात तीन किलोमीटर पायी चालावे. शरीर सुदृढ राहण्यासाठी आनंदी जीवन जगावे. याप्रसंगी व्यासपीठावर नासिक येथील नाईनपल्स हॉस्पिटल चे संचालक डॉ.शीतल हिरण,रोटरी नागरी सहकारी पतपेढीचे चेयरमैन सुरेश कवाड, संस्थापक अध्यक्ष रमेश पारख, पारख होस्पिटल्चे संचालक डॉ.सोहनलाल पारख, डॉ.सचिन पारख, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष धनराज श्रीश्रीमाळ, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष सुमित चतुरमुथा आदी मान्यवर उपस्थित होते. सदर हृदय विकार निदान शिबिर यशस्वी होण्यासाठी जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष सुमित चतुरमुथा, सचिव सुनील पारख, गणेश कोटेचा, दिनेश कर्णावट,भीकम बोथरा, संजय दुग्गड,नरेंद्र छाजेड़, महेंद्र चोपड़ा, रितेश गोलेछा , अभय कवाड़, रितेश कवाड़, रमेश पारख, प्रदीप पारख, अनिल पारख, नरेंद्र रूणवाल, मनोज मालू,सुनील खिवसरा,जयदीप सेठ, डॉ. प्रफुल्ल दुग्गड, डॉ. सचिन पारख, जितेंद्र कोटेचा, अमरीश चतुर मुथा, रविंद्र कोटडिया,नवणित रुणवाल आदींनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने