ओबीसी, बहुजन समाजाची एकजुट मजबूत करा :- adv प्रियदर्शनी कोकरे
कुणबी प्रमाण पत्राला हरकती घेण्यासाठी 16 फेब्रुवारीपर्यंत मुदत इंदापूर तालुक्यात गावोगावी फॉर्मचे वाटप व जनजागृती
प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे:- लाकडी, वायसेवाडी, काझड येथे ओबीसी समाजाच्या वतीने बैठक घेण्यात आली. 16 फेब्रुवारी पर्यंत ओबीसी समाजाने जास्तीत जास्त हरकती नोंदवाव्यात यासाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने घोंगडी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रियंदर्शनी कोकरे यांनी ओबीसी बहुजन समाजाने एकजुटीने काम करावे पुढच्या पिढीसाठी ओबीसी आरक्षण महत्वाचे आहे, राज्य सरकारने ओबीसी समाजावर अन्याय करू नये अन्यथा याचे गंभीर परिणाम येत्या काळात भोगावे लागतील. हे राज्य संविधानावर चालते, यामध्ये संविधानाने दिलेल्या हक्काला धक्का लावू नये असे यावेळी adv प्रियदर्शनी कोकरे म्हणाल्या.
देवेंद्र बनकर यांनी ओबीसी भटके विमुक्त समाजाने एकत्र येऊन आपल्या न्याय हक्कासाठी मोठा लढा उभारला पाहिजे रात्र वैऱ्याची आहे, समाज प्रबोधन करून जागृती वाढवा असे बनकर यावेळी म्हणाले.
यशवंत ब्रिगेड चे अध्यक्ष बापूराव सोलनकर, काझडचे माजी सरपंच बाळासाहेब पाटील, लाकडीचे दत्तात्रय वनवे, अकोले गावचे ग्रामपंचायत सदस्य बबन सोलनकर, अंकुश पडळकर, रासपचे अण्णा पाटील, संजय पांढरे, नवनाथ नरुटे, देविदास नरुटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

