शहादा येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीची निवडणूक कार्यक्रम जाहीर
प्रतिनिधी शहादा , सुमित गिरासे
उंटावद तालुका शहादा येथील लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीची निवडणूक लागली आहे.उमेदवारी अर्ज दाखल आहेत.येत्या १० फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतर निवडणुकीचे जरी चित्र स्पष्ट होणार असले तरी सत्ताधारी गट दीपक पुरुषोत्तम पाटील व अभिजीत पाटील गटात निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता असल्याने शहादा तालुक्यातील राजकारण सूतगिरणीच्या निवडणुकीमुळे तापले आहे.
सहकार व शिक्षण महर्षी स्वर्गीय अण्णासाहेब पि.के.पाटील यांनी शहादा तालुक्यात अनेक सहकारी प्रकल्प उभारलेत.त्यापैकी जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी हे अत्यंत महत्त्वाची आहे.सहकार क्षेत्रात स्वर्गीय पि.के. अण्णा पाटील यांचे नाव राज्यात आदराने घेतले जाते.जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील गेले होते.सूतगिरणीचे सूत परदेशात देखील जात होते.आर्थिक स्थिती बघता सध्या सूतगिरणी बंद आहे.पण सभासदांच्या व परिसरातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने सूतगिरणीला अधिक महत्त्व आहे.सूतगिरणीला पुन्हा ऊर्जित अवस्थेत आणावी असा कल शेतकऱ्यांच्या - सभासदांच्या आहे.त्या दृष्टीने निवडणुकीकडे बघितले जात आहे.
आतापर्यंत सूतगिरणीच्या इतिहासात स्वर्गीय पि.के.अण्णा पाटील गटाचेच वर्चस्व राहिले आहे.त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र दीपक पुरुषोत्तम पाटील चेअरमन होते व वर्चस्व त्यांचेच होते.सूतगिणीच्या इतिहासात एक-दोन वेळा वगळता निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.आता ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्न विविध बैठकातून केला जात असल्याचा प्रयत्न आहे.
सूतगिरणीचे साधारणता ९ हजार पर्यंत सभासद असून २१ जागांसाठी निवडणूक होत आहे.निवडणूक जरी महत्वाची असली तरी सूतगिरणी सुरू करणे हा महत्त्वाच्या विषय आहे.सूतगिरणीच्या निवडणुकीमुळे शहादा तालुक्यातील राजकारण तापले असून सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे लक्ष निवडणुकीकडे लागले आहे.बडी राजकीय मंडळी पडद्याआड सक्रिय झालेले आहेत.काही राजकीय नेते निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न करीत आहेत.
सत्ताधारी दीपक पुरुषोत्तम पाटील व शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील यांचे गट निवडणुकीच्या माध्यमातून आमने-सामने येण्याच्या अंदाज आहे.दीपक पाटील हे माजी आमदार व सहकार महर्षी स्वर्गीय पि.के.अण्णा पाटील यांचे सुपुत्र आहेत. राजकारणात अनुभवी असून जिल्ह्यात मातब्बर नेते म्हणून त्यांची गणना केली जाते.माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आहेत.शहादा तालुक्याचा राजकारणावर चांगली पकड आहे.तर अभिजीत पाटील हे राजकारणातील जिल्ह्याचे अनुभवी नेते माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व शहादा तालुका एज्युकेशन संस्थेचे चेअरमन मोतीलाल पाटील यांचे सुपुत्र आहेत.अभिजीत पाटील देखील जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती व विद्यमान शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहे.राजकारणात ते देखील अनुभवी असल्याने निवडणूक झाल्यास चांगलीच चुरशीची होऊन गाजणार असल्याची चिन्हे आहेत.
मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी व सू
तगिरणीला ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या राजकारणाच्या शिरकाव न होता निवडणूक बिनविरोध व्हावी हा कल तालुक्यात आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अभिजीत पाटील गटाचा कार्यकर्त्यांची बैठक त्यांच्या निवासस्थानी झाली होती तर दीपक पुरुषोत्तम पाटील गटाची बैठक दिनांक ४ फेब्रुवारी रोजी लोणखेडा येथील इंजीनियरिंग महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केली होती.दोन्ही गटाकडून कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत.
