शहाद्यात औषधाच्या ट्रकमधून जप्त केला 37 लाखांचा गुटखा ट्रक चालकास अटक ; शहादा पोलिसांची कारवाई
शहादा -
औषधी साहित्य वाहून येणाऱ्या ट्रक मधून 37 लाख रुपये किमतीचा गुटखा तसेच 15 लाख रुपये किमतीwचा ट्रक असा सुमारे 52 लाख रुपयांचा मुद्देमाल शहादा पोलिसांनी जप्त केला आहे काल दिनांक 9 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शहादा दोंडाईचा रस्त्या नजीक बालाजी रेसिडेन्सी जवळ ही कारवाई करण्यात आली आहे
महाराष्ट्रात तंबाखू मिश्रित गुटखा विक्री व साठा करण्यास प्रतिबंध असतानाही सर्रासपणे त्याची अवैधरित्या विक्री व साठा केला जात आहे त्यामुळे पोलिसांनी त्यावर करडी नजर ठेवली आहे काल दिनांक नऊ रोजी मोठ्या ट्रक मधून गुटख्याची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार दुपारी 4 वाजता दोंडाईचा रस्त्यावरील बालाजी रेसिडेन्सी जवळ ट्रक क्रमांक आर जे - २१ जी सी - 3994 संशयास्पद रित्या दिसल्याने या ट्रकची तपासणी केली असता त्यात 37 लाख रुपये किमतीचा सुंदर सुगंधित तंबाखू व गुटखा तसेच 15 लाख रुपये किमतीचा ट्रक असा सुमारे 52 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वाहन चालक श्रवणराम बीडदारामजी जाट (रा - नागोर , राजस्थान ) यास अटक करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, उपनिरीक्षक माया राजपूत, उपनिरीक्षक छगन चव्हाण, अभिजीत अहिरे, हवालदार दिनकर चव्हाण, भरत उगले ,मुकेश राठोड, संदीप लांडगे, दत्ता बागल ,जितेंद्र सूर्यवंशी ,यांनी केली आहे विकास शिरसाट यांच्या फिर्यादीवरून प्रचालक जाट याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे तपास उपनिरीक्षक अभिजीत अहिरे करीत आहेत

