खेतीया शहादा रस्त्यावर सुलतानपूर फाटा येथे लाख रुपये किमतीच्या गुटखा म्हसावद पोलिसांकडून जप्त
प्रतिनिधी सुमित गीरासे
खेतीया शहादा रस्त्यावर सुलतानपूर फाटा येथे सार्वजनिक जागी एक लाख रुपये किमतीच्या गुटखा म्हसावद पोलिसांनी पकडला असून संशयित आरोपीस अटक करून गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार म्हसावद पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी गुप्त माहितीच्या आधारे पोलीस हवालदार बहादूर भिलाला, पोलीस नाईक दादाभाई साबळे, पोलीस शिपाई राकेश पावरा, सचिन तावडे यांनी सापळा रचून खेतीया शहादा रस्त्यावर सुलतानपूर फाटा येथे सार्वजनिक जागी काळ्या रंगाची ॲपे रिक्षा (क्र. एम. एच.१८,बीएच१४८४) आढळून आली. रिक्षा तपासणी केली असता त्यात एक लाख ८९६ किमतीच्या एकूण पाच निळ्या रंगाच्या मोठ्या गोण्या त्यात प्रत्येकी ५२ केसरयुक्त विमल पान मसाला गुटक्याचे पाऊच असे एकूण २६० पाउच, पांढऱ्या रंगाचा एकूण पाच गोण्या प्रत्येक गोणी मध्ये ५२ भिवंत तंबाखूचे पाऊच एकूण २६०पाऊच. तीन पांढऱ्या रंगाच्या गोण्या त्यात ६० खोके त्यावर बोलो जुबा केसरी असे लिहिलेले तसेच तीन लाख रुपये किमतीची काळ्या रंगाची ॲपे रिक्षा असा एकूण चार लाख ८९६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयित आरोपी फैजान मोहम्मद सिराज अन्सारी (वय २१) रा. आझाद नगर, वडजाई रोड धुळे याला अटक केली आहे. याबाबत पुढील तपास म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजन मोरे करीत आहेत.
