*नंदूरबार लोकसभा निवडणूकीत बिरसा फायटर्स व काँग्रेस मध्ये लढत,भाजप पिछाडीवर*
*स्ट्राव पोलवर काँग्रेस आघाडीवर, बिरसा फायटर्स दुस-या क्रमांकावर तर भाजप तिस-या क्रमांकावर*
नंदूरबार: स्ट्राव पोलच्या लिंक वर दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी एक तासापूर्वीच मतदान सुरू झाले.या पोलवर महाविकास आघाडी,महायुती व इतर( बिरसा फायटर्स) अशे पर्याय देण्यात आले. कुणाल जैन यांनी ही लिंक ग्रूपवर टाकली.काँग्रेस पक्षाकडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार के .सी.पाडवी व भाजप पक्षाकडून म्हणजेच महायुतीकडून भाजपचे खासदार हिना गावित यांना उमेदवारी मिळू शकते.अशी राजकीय चर्चा सुरू आहे.बिरसा फायटर्स कडून अपक्ष उमेदवार म्हणून बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मतदारांनी आप आपल्या पसंतीच्या उमेदवाराला पोलींगच्या माध्यमातून मतदान सुरू केले आहे.
२ तासापूर्वी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ३०२ मते , इतर म्हणजे बिरसा फायटर्सच्या उमेदवाराला १८७ मते तर महायुतीच्या उमेदवाराला १०७ मते मिळाली आहेत. भाजप पिछाडीवर असल्यामुळे काँग्रेस व बिरसा फायटर्स उमेदवारांत थेट लढत होईल, असे चित्र दिसत आहे.सोशल मिडीयावरचा हा निकाल नंदूरबार लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कल तपासणारा ठरू शकतो.
