आशा स्वयंसेवक आणि गटप्रवर्तकांचे निवेदन, मोर्चा काढण्याचा इशारा



आशा स्वयंसेवक आणि गटप्रवर्तकांचे निवेदन, मोर्चा काढण्याचा इशारा

शिरपूर:  शिरपूर तालुक्यातील आशा स्वयंसेवक आणि गटप्रवर्तकांनी दिनांक 12/ 1 /24 रोजी माननीय तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच माननीय प्रांत अधिकारी यांना संपाचे निवेदन दिले. त्या निवेदनात आशा स्वयंसेवक आणि गटप्रवर्तकांनी आपल्या मनातील भावना मांडताना म्हणाल्या 18 /10/ 23 ते 9/ 11/ 23 या काळात संपूर्ण महाराष्ट्रातील आशा स्वयंसेवक व गटप्रवर्तक यांनी संप पुकारला होता. राज्य सरकारने आशा आणि गटप्रवर्तक कृती समितीला आशांना सात हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधन वाढ तसेच दोन हजार रुपये दिवाळी भाऊबीज भेटआणि एपीएल व बीपीएल भेद राहणार नाही असे आश्वासन दिले होते .परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही .नागपूर च्या हिवाळी अधिवेशनात दिनांक 18/ 12/ 2023 रोजी प्रचंड मोर्चा काढून निर्णय त्वरित करण्याची विनंती केली. परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही.म्हणुन महाराष्ट्र राज्यातील आशा स्वयंसेवक व गटप्रवर्तक यांनी पुन्हा 29/ 12/ 2023 पासून ऑनलाइन च्या सर्व कामावर बहिष्कार टाकून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तरीही सरकारने शासन निर्णय निर्गमित केला नाही. परिणामी राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मनामध्ये शासना प्रती तीव्र नाराजी निर्माण होत चालली आहे .शासनाने लवकरात लवकर मान्य केलेल्या मागणीबाबत शासन निर्णय निर्गमित करावा यासाठी दिनांक 12 /1/ 2024 पासून राज्यभरातील सर्व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी पुन्हा बेमुदत संप पुकारला आहे.
               संप पुकारल्याने आरोग्य विभागाच्या कामकाजावर परिणाम होणार आहे .गावपातळीवर काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संपावर गेल्याने लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यास अडचण निर्माण होऊ शकते.
            संपाचे निवेदन देताना आशा व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हिरालाल परदेशी, तालुका अध्यक्ष अरूणा सूर्यवंशी, कार्याध्यक्ष स्मिता दोरीक, तसेच गटप्रवर्तक आशा मैराळे ,आशा वडवी, आक्का पावरा ,आशा स्वयंसेवक सपना पावरा ,वैशाली बारी, ज्योती पाटील, स्नेहल वाघ, मनीषा बारी ,दीपा सासर, राधिका मराठे उपस्थित होत्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने