कामासाठी बाहेर पडले*;
*वाटेतच नियतीनं डाव साधला*,
*शिक्षकाच्या अचानक जाण्यानं गावात हळहळ*
प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील बारामती इंदापूर रस्त्यावर दुचाकी आणि चार चाकी गाडीच्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
या अपघातामध्ये सणसर (ता. इंदापूर) येथील दुचाकी चालक
बलभीम ज्ञानदेव काळे यांचा जागेवर मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,
बलभीम काळे हे सात वाजण्याच्या सुमारास मोटार सायकलवरून (एम एच ४२ डी ३७५१ ) सणसर कडून भवानीनगरकडे चालले होते.
भवानीनगरमधील आय.सी.आय.सी.आय. बँकेसमोर अपघात होऊन भरधाव वेगाने चाललेल्या हायवा गाडीने चिरडल्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर हायवा गाडीचा चालक गाडी घेऊन भरधाव वेगाने निघून गेला. बलभीम काळे हे
श्री छत्रपती हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. बारामती इंदापूर रस्त्याने सणसर भवानीनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हायवा गाड्या पालखी मार्गाच्या कामामुळे चालतात.
या हायवा गाड्या प्रचंड वेगाने चालवल्या जात असल्यामुळे या गाड्यांच्या वेगाला मर्यादा आणावी,
अशी ग्रामस्थांनी अनेकवेळा मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे.

