भोरखेडा विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न




भोरखेडा विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

शिरपूर  -दिनांक 11.01.2024 शुक्रवार रोजी भॊरखेडा महाविद्यालयात ‘मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर एफ. शिरसाठ उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक श्री सी.जी पाटील सर तसेच शाळेचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची अधिष्ठात्री  देवी माता सरस्वतीचे प्रतिमा पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री एन वाय. बोरसे सर यांनी केले. कार्यक्रमाला  आलेले माजी विद्यार्थी डॉक्टर,वकील,शेतकरी,इंजीनियर,शिक्षक,क्लार्क,आर्मी,एम.एस.इ.बी. त काम करणारे तसेच राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे सरपंच,पोलीस पाटील, उपसरपंच पदावर असणारे विद्यार्थी हॆ सर्व माजी विद्यार्थी मेळाव्याला उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य आर. एफ. शिरसाठ सर यांच्या हस्ते माजी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर माजी विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपले मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थी अनिल भोई म्हणाला की या शाळेने मला शिकवले खूप मोठे केले म्हणून मी आज माझ्या पायावर उभा आहे स्वतःचं स्टोन क्रेशर सुरू केलेले आहे. मी एका TV वृत्तवाहिनीचा उत्तम संपादक आहे तसेच ऍडवोकेट शरद चिंतामण पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले मनोगत व्यक्त करताना त्यांनी विद्यार्थ्यांना इन्स्पायर करत मी इयत्ता नववीत शाळा सोडली असताना सुरत गेलो असताना शिक्षकांनी मला परत बोलावले. अकरावी बारावी आर.सी पटेल भोरखेडा येथे आल्यानंतर माझ्यातला विद्यार्थी जागा झाला व मी आज वकील या पदापर्यंत जाऊन पोहोचलो शाळेचा माजी विद्यार्थी राहुल कोळी यांनी शाळेचा नावलौकिक वाढत असताना विद्यार्थ्यांसाठी ही शाळा कशा प्रकारे मेहनत घेते त्याचेच उत्तम विद्यार्थी कुशल प्रशासक हॆ फळ आहे हे आपल्या मनोगततून व्यक्त केले. तसेच बबळाज येथील पोलीस पाटील यांनी शाळेचा इतिहास, नावलौकिक शाळेने दिलेलं योगदान तसेच शाळेची प्रगती याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.त्यात शाळेचा माजी विद्यार्थी अनिल अभिमान भोई राहणार तोंदे यांनी शाळेतील गरीब विद्यार्थयांसाठी शैक्षणिक साहित्यासाठी 11000 रुपये दिले. तसेच शाळेचे प्राचार्य आदरणीय आर. एफ. सिरसाठ सर यांनी आपली लाडकी कन्या कै. श्वेतलच्या स्मृती प्रित्यर्थ 10001 रुपये शाळेच्या ग्रंथालयाला पुस्तक म्हणून भेट दिली. तसेच शाळेचा माजी विद्यार्थी पी.एस.आय. शिवाजी राजपूत यांनी 11 हजार रुपये ग्रंथालयास पुस्तक भेट फोनवरून जाहीर केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.आर.देसले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. व्ही. बी.शर्मा यांनी मानले.
 कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री एन. वाय. बोरसे,व्ही. एस. ईशी,पी.टी.चौधरी, पी. एस. परदेशी,एस.एम. पाटील, एस. आर.देसले, एन. डी. चव्हाण, डी. आर.राजपूत, एम जी  वाडीले,आर. जी. पाटील, व्ही. डी. पाटील, सुनील पावरा,जे. डी. पाटील, तुषार पाटील , अफ्रीद पटेल, श्रीमती मीना पटेल मॅडम,दिपाली निकम मॅडम, तिरमले मॅडम,मोराणकर मॅडम शाम जाधव अनिल खुटे व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांनी सहकार्य केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने