सरस्वती विद्यालयात बालिका दिन उत्साहात साजरा




सरस्वती विद्यालयात बालिका दिन उत्साहात साजरा

शिरपूर - श्री हनुमान व्यायाम मंदिर ट्रस्ट संचलित सरस्वती शिशु प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. *या निमित्ताने शिरपूर पोलीस स्टेशनचे दामिनी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक  सौ. छाया पाटील मॅडम यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यांच्यासोबत महिला पोलीस भगिनी सौ.अनुराधा धाकड, सौ. पौर्णिमा पाटील सौ रोशनी पाटील सौ‌. नूतन सोनवणे मॅडम उपस्थित होत्या* विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सौ.पाटील मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या आठवणींना उजाळा दिला तसेच मुलींनी कोणती काळजी घ्यावी. स्वतःचे रक्षण कसे करावे तसेच कशाचीही भीती न बाळगता आपले पालक शिक्षक व आम्हाला आपली समस्या सांगावी असे सांगितले. आपल्या सर्वसामान्य परिस्थितीचा बहाणा न करता तिच्यावर मात करून ऐच्छिक ध्येय प्राप्त करून घ्यावे. आपण अभ्यास करत असताना आपले आई-वडील आपल्यासाठी घेत असलेले श्रम व कष्ट याची आठवण करावी.*विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पोलीस स्टेशन मार्फत पोलीस दादा व पोलीस दिदी हे संकल्पना राबवली जात असल्याचे त्यांनी नमूद केले* विद्यालयाकडून सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री व्हि. जे.बागुल यांनी केले. कार्यक्रम  यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने