🥀 *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिवस व शालेय पुस्तक प्रदर्शन*
दोडाईचा अख्तर शाह
दोंडाईचा स्वोद्धारक विद्यार्थी संस्थेचे राऊळ दौलतसिहंजी बहुउद्देशीय माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच यावेळी शालेय पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य एस के चंदने व सकाळ विभागासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती रीना गिरासे व दुपार विभागासाठी श्रीमती सिमा येशी हे होते, प्रा जी वाय बोरसे, प्रा बी जी शिंदे, प्रा एच् आर भावसार, श्री बडगुजर, प्रा.पी एस शिंदे, क्रिडा शिक्षक एन एस पाटील व कला शिक्षक राजन मोरे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची महती सांगून, समाज कार्याबद्दल अमूल्य मार्गदर्शन केले.
यावेळी एम सी व्ही सी विभाग प्रमुख प्रा. डॉ. एन व्ही पंचभाई, ज्येष्ठ लिपिक संजय चौधरी, एस एस लोहार, आर ए पवार, बी पी ठाकूर, आर डी पाटील, डि व्ही गिरासे, एस डी पाटील, एस डी जाधव, दुशंत वाघमारे, यू के पाटील, मनोहर कापूरे, एस आर तावड़े, ग्रंथपाल संजय कुंभार, आंतरवासिता शिक्षक सागर ठाकूर, निलेश महाले, आशितोष सिसोदिया, कुणाल सदाराव, जागृती निकम आदि शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. फलकलेखन राजन मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा जे एच् गिरासे, एन एस पाटील यांनी केले.
