जयश्रीबेन अमरीशभाई पटेल सी.बी.एस. ई स्कूल मधील तीन विद्यार्थीनीं चा राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेमध्ये सहभाग



 जयश्रीबेन अमरीशभाई पटेल सी.बी.एस. ई स्कूल मधील   तीन विद्यार्थीनीं चा राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेमध्ये सहभाग

शिरपूर (प्रतिनिधी )-शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित वाघाडी ता.शिरपूर येथील जयश्रीबेन अमरीशभाई पटेल सी.बी.एस. ई स्कूल मधील,  तीन विद्यार्थिनींची राज्यस्तरीय हँडबॉल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये निवड झाली . हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र व  हँडबॉल असोसिएशन ऑफ औरंगाबाद डिस्ट्रिक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ४९ वरिष्ठ महिला राज्यस्तरीय हँडबॉल अजिंक्यपद स्पर्धा  २०२३ -२४ या  या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थिनी आरुषी पाटील , राजनंदिनी राजपूत व हर्षिता मराठे   या विद्यार्थिनी धुळे संघाकडून खेळल्या . या विद्यार्थिनींना हँडबॉल खेळाचे प्रशिक्षण क्रीडा शिक्षक श्री. सचिन सिसोदिया सरांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
  प्राचार्या आदरणीय सौ. मेघा मुंगसे मॅडम व शाळेतील शिक्षकांनी यांनी विद्यार्थिनींच्या राज्यस्तरीय खेळासाठी त्यांचे कौतुक केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने